The Kerala Story Collection Day 2: प्रचंड विरोधानंतर ‘द केरला स्टोरी’ केले दुसऱ्या दिवशी धमाकेदार कलेक्शन…

पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बक्कळ कमाई केली.
The Kerala Story Collection Day 2
The Kerala Story Collection Day 2Instagram @sunshinepicturesofficial
Published On

The Kerala Story Box Office Collection Day 2: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र कमालीचा चर्चेत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट कमालीचा वादात सापडला होता, सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली जात होती, चित्रपटासमोर अनेक वाद समोर असताना ही ५ मे २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सोबतच चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद ही दिला. पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बक्कळ कमाई केली.

The Kerala Story Collection Day 2
Jawan Release Date Out: शाहरुख खानच्या 'जवान'चे नवीन पोस्टर प्रदर्शित; सप्टेंबरमध्ये होणार धमाका

विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची चर्चा सध्या सुरू आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक होते. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने शुक्रवारी 8 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी चित्रपटाने कमाईत मोठी गरुडझेप घेतली.

‘द केरला स्टोरी’ने दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेड्सनुसार, चित्रपटाने शनिवारी 12.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तथापि, कमाईचा आकडा यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो.

The Kerala Story Collection Day 2
Shiv Thakare: शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’ 13 साठी सज्ज; आईकडून औक्षण करुन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल...

‘द केरला स्टोरी’ ही केरळमधील 3 मुलींची कथा आहे, ज्यामध्ये त्यांचे ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर केले जाते आणि नंतर त्या दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होतात. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही अनेक राजकीय नेते करत होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती फेटाळण्यात आली होती.

चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत आहेत. या चौघींच्या ही अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com