South Actor Bonda Mani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Comedian Bonda Mani Died: प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचे निधन, साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा

South Actor Bonda Mani Movie: बोंडा मणी यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत बोंडा मणी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Priya More

South Actor Bonda Mani:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Film Industry) दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन बोंडा मणी यांचे निधन झाले. किडनीशी संबंधित आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फिल्म ट्रेड एनालिस्ट श्रीधर पिल्लई यांनी बोंडा मणी यांच्या निधनाच्या (Bonda Mani Dies ) वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत बोंडा मणी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बोंडा मणी हे पोझिचलूर येथील घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ कोमपेट येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. अंतिम दर्शनसाठी बोंडा मणी यांचे पार्थिव पोझिचलूर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. कोमपेट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत बोंडा मणी यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले की, 'तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन बोंडा मणी (६० वर्षे) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले.' बोंडा मणी यांच्या पश्चात पत्नी मालती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. बोंडा मणी हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते.

आजारी असलेल्या बोंडा मणी यांना २०२२ मध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार धनुष आणि विजय सेतुपती यांनी उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये मदत म्हणून दिले होते. वाडीवेलू यांनीही त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती. बोंडा मणी यांनी वाडीवेलूसोबत अनेक वर्षे काम केले होते.

दरम्यान, बोंडा मणी यांनी जवळपास ३ दशकांपेक्षा जास्त काळ सिनेसृष्टीत काम केले. त्यांनी २७० चित्रपटांमध्ये अनेक कॉमिक भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले. भाग्यराजच्या 'पावुन्नु पावुनुधान' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.'पोनविलंगु', 'पोंगालो पोंगल', 'सुंदरा ट्रॅवल्स', 'मरुदामलाई', 'विनर', 'वेलायुधम' या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती देखील दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT