Renjusha Menon Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Renjusha Menon Death reason : ३५ वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, घरात आढळला मृतदेह

Priya More

South Film Industry:

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. मल्याळम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रंजूषा मेननचा मृत्यू झाला आहे. घरातच अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 35 वर्षीय अभिनेत्री तिरुवनंतपुरममध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. राहत्या घरामध्ये रंजूषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

30 ऑक्टोबर रोजी सकाळी रंजूषाचा मृत्यू झाला असून आता त्याची माहिती समोर आली आहे. रंजूषाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण इतक्या कमी वयात तिने जगाचा निरोप घेतल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजूषाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. तिरूवनंतपुरममध्ये ती ज्या भाड्याच्या घरामध्ये राहत होती तिथेच तिचा मृतदेह आढळून आला. गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यांनी रंजूषाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. सध्या तिचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही.

ज्या घरामध्ये अभिनेत्रीचा मृतदेह आढळला आहे त्या घरामध्ये ती आपल्या कुटुंबीयांसोबत भाड्याने राहत होती. श्रीकार्यम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की तिच्या मृत्यूमागचे कारण काय आहे. पण प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. या अभिनेत्रीचे वय ३५ वर्षे होते.

अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सोमवारी सकाळी लवकरच उठणाऱ्या अभिनेत्रीच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद होता. दरवाज वाजवून देखील तिने दरवाजा खोलला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तर त्यांना धक्का बसला. कारण गळफास लावलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह दिसला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

रंजूषा मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दमदार सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. ती शेवटी 'आनंदरागम'मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. 'सिटकॉम वरण डॉक्टरनू'मध्ये तिने विनोदी भूमिका साकारली होती. 'एंटे माथावू' आणि 'मिसेस हिटलर' यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT