साऊथमधील सुप्रसिद्ध अभिनेता यशची फॅन फॉलोविंग फक्त देशातच नाही तर, जगभरात पाहायला मिळत आहे. ‘केजीएफ’नंतर त्याची कमालीची लोकप्रियता वाढली आहे. नुकतंच टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील आणि चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांनी ‘केजीएफ’स्टार यशबाबत वादग्रस्त विधान केले आहे. चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनी नुकतंच ‘केजीएफ’स्टार यशबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एका कार्यक्रमामध्ये चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलताना, निर्मात्यांनी फी वाढवणाऱ्या अभिनेत्यांना चांगलंच झापलं आहे. यावेळी अल्लू अरविंद यांनी केजीएफ स्टार यशबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. “केजीएफ रिलीज होण्याआधी त्याची जास्त प्रसिद्धी नव्हती. त्याला कोण ओळखत होतं? आपलं सादरीकरण, प्रभावशाली प्रॉडक्शन हाऊस आणि बिगबजेट चित्रपट या कारणामुळे तो बॉक्स ऑफिसवर चर्चेत राहतो. कोणताही अभिनेता जेव्हा चित्रपटामध्ये लीड रोल साकारतो, त्यावेळी त्याला चित्रपटाच्या बजेटमधल्या २० ते २५ टक्के रक्कम फी म्हणून मिळते. पण जेव्हा चित्रपटाचं बजेट वाढते, तेव्हा तसे होत नाही.” (Tollywood)
“आपण कोणत्याही कलाकाराच्या फीमुळे चित्रपटाचे बजेट वाढले, असे बोलू शकत नाही. अभिनेता कोणीही असला तरी निर्माते चित्रपटामध्ये गुंतवणूक करतात. ‘केजीएफ’ रिलीज होण्यापूर्वी यश कोण होता? तो चित्रपट का हिट झाला?” असा सवाल अल्लू अरविंद यांनी उपस्थित केला आहे.
“निर्मिती आणि भव्य दिव्य सेट्समुळे तो चित्रपट हिट ठरला होता. हे फक्त उदाहरण आहे. फिल्ममधला हिरो कोणीही असो, चित्रपट मेकिंगमुळे तो प्रेक्षकांना आकर्षित करतो. चित्रपट देताना गुणवत्ता देणेही महत्वाचे असते.” असं टॉलिवूड फिल्म निर्माता अल्लू अरविंद म्हणाले आहेत.
अल्लू अरविंदच्या या वक्तव्यावर यशने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यश सध्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. यश प्रभासच्या ‘सालार’मध्येही कॅमिओ करण्याची शक्यता आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. चित्रपटामध्ये प्रभू रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साऊथची परमसुंदरी साई पल्लवी दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.