साऊथ फिल्म इंडस्ट्रीची (South Film Industry) सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती षणमुगा प्रियाच्या (Sruthi Shanmuga Priya) आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचा पती अरविंद शेखरचे (Arvind Shekhar) निधन झाले आहे. एका वर्षापूर्वीच श्रुती आणि अरविंदने लग्न केले होते. दोघेही गेल्या वर्षी २७ मे रोजी विवाहबंधनात अडकले होते.
काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त श्रुतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून पतीला शुभेच्छा दिल्या होत्या. श्रुतीचा पती अरविंद शेखर हा देखील प्रसिद्ध स्टार होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद शेखरचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी अरविंद शेखरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेखरच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेखरच्या निधनामुळे तमिळ चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
श्रुती षणमुगा प्रियाचे पती अरविंद शेखरचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन झाले. श्रुती आणि शेखर हे कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय असायचे. दोघेही अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असत. साऊथ इंडस्ट्रीतील हे सर्वांचे आवडते कपल होते. अरविंद हा बॉडी बिल्डर होता. तसंच, त्याच्या इन्स्टा बायोनुसार तो बॉडीबिल्डर प्रशिक्षक देखील होता.
श्रुती षणमुगा प्रियाने पतीच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये श्रुतीने पतीसोबतचा फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, 'फक्त शरीर वेगळे झाले आहे. पण तुझा आत्मा आणि विचार नेहमी माझ्यासोबत राहतील आणि ते नेहमी माझे रक्षण करतील. माझा प्रिय अरविंद शेखर... माझे तुझ्यावरील प्रेम अजूनच वाढले आहे. आम्ही आधीच एकमेकांसोबत खूप आठवणी गोळा केल्या आहेत ज्या मी आयुष्यभर जपत राहीन. तुझी खूप आठवण येते आणि तुझ्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रेम करते अरविंद. मला तू नेहमी माझ्याजवळ वाटतो.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.