Yashwantrao Chavan Natyasankul : 'यशवंतराव नाट्यगृह' रसिकप्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज; दिग्गजांच्या नाटकाने उघडणार रंगमंदिराचा पडदा

Ashok Saraf - Prashant Damle : दिग्गज नाट्यकलावंतांच्या नाटकाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे.

Yashwantrao Chavan Natyasankul
Yashwantrao Chavan Natyasankul Saam TV
Published On

Yashwantrao Chavan Natyasankul Reopens : नाट्यरसिकांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या 'यशवंतराव' नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. दिग्गज नाट्यकलावंतांच्या नाटकाने यशवंतराव नाट्यगृह पुन्हा सुरू होणार आहे.

शनिवार ५ ऑगस्टला अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ आणि रविवार ६ ऑगस्टला प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे.

विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.


Yashwantrao Chavan Natyasankul
Amruta Deshmukh Share Video: प्रसाद-अमृताचा हटके कांदे-पोहे कार्यक्रम, परंपराच बदलून टाकली; किचनमध्ये काय झालं?

नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाट्यगृह १ ऑगस्ट पासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. हे नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.

नाट्य संकुलात नाट्यगृह, नाटकाच्या तालमीसाठी अद्ययावत तालीम हॉल, छोट्या कार्यक्रमांसाठी मंच, लायब्ररी, नाट्य कला अकादमी, कलावंतांसाठी निवास व्यवस्था व नाट्यअनुषंगिक सर्व घटकांसाठी नाट्यपरिषद पुढील काळात वाटचाल करणार आहे. (Latest Entertainment News)


Yashwantrao Chavan Natyasankul
Chhavi Mittal Share Post: कॅन्सरचा लढा जिंकल्यानंतर अभिनेत्रीला पुन्हा गंभीर आजाराने ग्रासले; पोस्ट शेअर करत दिली अपडेट

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह १ जुलैपासून सुरू होणार होते. परंतु नाट्यगृह सुरू होण्यास एक महिना लागला. या नाट्यगृहात आधीपासूनचा नेक कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत. यात मोहन जोशी आणि वंदना गुप्ते यांच्या जीवनगौरव पुरस्काराचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com