Divya Spandana Death Fake News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Divya Spandana: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची अफवा, नेटिझन्सनी सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

Divya Spandana Death Fake News: दिव्या स्पंदना यांच्या निधनाची बातमी पाहून अनेकांनी सोशल मीडियावर (Social Media) श्रद्धांजली देखील वाहिली.

Priya More

South Actress Death Fake News:

साऊथची अभिनेत्री (South Actress) आणि काँग्रेस नेत्या दिव्या स्पंदना उर्फ ​​रम्या (Divya Spandana) यांचे निधन झाल्याची बातमी सध्या समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिव्या स्पंदना यांच्या निधनाची बातमी पाहून अनेकांनी सोशल मीडियावर (Social Media) श्रद्धांजली देखील वाहिली. पण अभिनेत्रीच्या या मृत्यूची बातमी खोटी असून अफवा पसरली आहे. एका पत्रकाराने दिव्या स्पंदना जीवंत असून त्यांची प्रकृती एकदम चांगली असल्याचे सांगितले.

काही तासांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल दिव्या स्पंदनाच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. या बातम्यांनंतर एका पत्रकराने दिव्या स्पंदना यांच्या लेटेस्ट मुलाखतीचा फोटो शेअर करत त्या जीवंत असल्याचे सांगितले. दिव्या स्पंदनाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर या पत्रकाराने ट्वीट करत करत दावा केला की, 'अभिनेत्री जीवंत आहे आणि एकदम चांगल्या आहेत. माझं आताच दिव्या स्पंदना यांच्यासोबत बोलणं झालं. त्या ठिक आहेत. त्या उद्या बंगळुरूला येणार आहेत.

दिव्या स्पंदनाच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे ट्वीट करण्यापूर्वी या पत्रकाराने अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या दिव्या यांच्यासोबतच्या भेटीचा फोटोही पोस्ट केला होता. या फोटोसोबत या पत्रकाराने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'दिव्या स्पंदना एका अतिशय प्रतिभावान आणि सज्जन महिलेसोबतची भेट खूपच आश्चर्यकारक होती. जिनिव्हामध्ये आम्ही रात्री जेवले. आम्ही बंगळुरूवरील आमच्या प्रेमासह अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या.'

२९ नोव्हेंबर १९८२ रोजी कर्नाटकमध्ये जन्मलेल्या दिव्या स्पंदना या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. त्यांना ऑनस्क्रीन रम्या म्हणून ओळखले जाते. अभिनेत्रीसोबत त्या राजकीय व्यक्ती म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्या कर्नाटकातील मंड्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्याचसोबत त्या लोकसभेत खासदार देखील आहेत. त्यांनी अनेक तमीळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांना साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड, उदय पुरस्कार आणि कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT