Vijay Deverakonda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Deverakonda : 'VD12'चा टीझर तीन भाषांमध्ये प्रदर्शित, हिंदीत आवाज कुणाचा? विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला...

VD12 Teaser Out : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'VD12' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर तीन भाषांमध्ये पाहायला मिळत आहे. कोणत्या कलाकारांनी याला आवाज दिला, जाणून घ्या.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'VD12' चांगलाच चर्चेत आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'VD12' नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. 'VD12' चित्रपट 30 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विजय देवरकोंडाचा 'VD12' चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला तीन भाषेतील वेगवेगळ्या कलाकारांनी आवाज दिला आहे. विजय देवरकोंडाने सोशल मीडियावर पोस्ट करून या तिन्ही कलाकारांचे आभार मानले आहे. विजय देवरकोंडाच्या 'VD12' चित्रपटाला हिंदीमध्ये बॉलिवूडच्या 'ॲनिमल' ने आवाज दिला आहे. टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आवाज ऐकून चाहते दिवाने झाले आहेत.

विजय देवरकोंडाने रणबीर कपूरसाठी एक खास पोस्ट केली आहे. त्याने लिहिलं की,"रणबीर...माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक...मी माझे वाक्य पूर्ण करण्याआधीच त्याने टीझर करण्यास होकार दिला होता. मी खूप उत्साहित आहे, माझ्या आवडत्या कलाकाराचा आवाज ऐकायला... धन्यवाद आरके... खूप प्रेम आणि मोठी मिठी"

विजय देवरकोंडाच्या 'VD12' चित्रपटच्या तेलुगू भाषेतील टीझरला साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने आवाज दिला आहे. तर तामिळ भाषेतील टीझरला अभिनेता सूर्याने आवाज दिला आहे. या दोघांचे देखील विजय देवरकोंडाने आभार मानले आहेत. 'VD12' चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडासोबत रश्मिका मंदाना, श्रीलीला, केशव दीपक हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT