Vijay Deverakonda SAAM TV
मनोरंजन बातम्या

भर गर्दीत Vijay Deverakonda जिन्यावरून पाय घसरून पडला; पुढं काय घडलं?

Vijay Deverakonda Accident : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा जिन्यावरून पाय घसरून पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. विजय देवरकोंडाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. सध्या विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जिन्यावरून पडताना विजय देवरकोंडा दिसत आहे.

काल 'साहिबा' या त्याच्या म्युझिक व्हिडीओचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी विजय देवरकोंडा उपस्थित होता. विजय देवरकोंडासोबतच अभिनेत्री राधिका मदान (Radhika Madan) देखील पाहायला मिळाली. तेव्हा पोस्टर लाँच झाल्यावर जेव्हा विजय देवरकोंडा बाहेर येत होता तेव्हा त्याचा पाय घसरतो आणि तो जिन्यावरून जोरात पडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विजय देवरकोंडा पडल्याचे पाहून सर्वजण त्याच्या मदतीसाठी धावून येतात. थोडक्यासाठी मोठी दुखापत होण्यापासून विजय वाचला. त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही आहे. शेवटी विजय सेल्फी देताना दिसला. विजयच्या या व्हिडीओवर चाहते आणि नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. काही जण विजयची काळजी करत आहेत. तर काही जण त्याची खिल्ली उडवत आहेत.

आता लवकरच विजय देवरकोंडा अभिनेत्री राधिका मदान सोबत 'साहिबा' या म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. विजय देवरकोंडा आणि राधिका मदान यांचा म्युझिक व्हिडीओमध्ये रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 21.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT