South Actor Prabhu Dies Twitter @immancomposer
मनोरंजन बातम्या

South Actor Prabhu Dies: मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते; प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचं उपचाराअभावी निधन

South Actor Prabhu Death: प्रभू यांच्यावर शासकीय रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू होते.

Pooja Dange

South Actor Prabhu Dies Due To Cancer : साऊथ चित्रपटामध्ये अनेक सहाय्यक भूमिका साकारलेले तमिळ अभिनेते प्रभू यांचे कॅन्सरने निधन झाले. स्टेज फोर लेव्हल कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतकार डी इमान यांनी प्रभू यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर करत शोकही व्यक्त केला आहे.

प्रभू यांच्यावर शासकीय रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू होते. मात्र, उपचार करूनही त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रभूंच्या निराधार अवस्थेबद्दल ऐकलेल्या इमानने पार्थिव स्वीकारण्यासाठी पुढे येऊन अंत्यसंस्कारही केले. (Latest Entertainment News)

डी इमान यांनीही ट्विटरवर दिवंगत अभिनेत्याला शोककळा वाहिली आहे. त्यांनी प्रभूचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले, अभिनेते प्रभू आता आमच्यात नाहीत. त्यांना स्टेज 4 कॅन्सर झाला आणि आज (14 जून) सकाळी या जगातून गेले. (Actor)

डॉक्टर, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना वाचविण्यासाटःई सर्वतोपरी प्रयत्न केले. तरीही त्यांना वाचवू शकलो नाही. माझ्या मनःपूर्वक संवेदना.” त्याच्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्याने अभिनेत्याला आर्थिक मदत केल्याचेही सांगण्यात येत आहे.

प्रभू यांनी 'पडिककथवन' आणि इतर 100 हून अधिक तमिळ चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. धनुषच्या पडिककथवनमधील त्याच्या अभिनयासाठी ते ओळखाल जात होते, जिथे त्याने एका श्रीमंत व्यक्तीची भूमिका केली होती.

असे म्हटले जाते की, कोविड आणि लॉकडाऊन दरम्यान त्यांना अभिनयाचे कोणतीही नोकरी न मिळाल्यामुळे त्याला कॅन्सरवर योग्य उपचार मिळू शकले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

SCROLL FOR NEXT