Sonu Sood  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonu Sood : हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं अभिनेत्याला पडलं महागात; आता कायदेशीर कारवाई होणार, पाहा VIDEO

Sonu Sood Video : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा सोशल मिडिया एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सोनू सूद तुफान बाईक चालवताना दिसत आहे. मात्र त्याच्या या बाईक राइडमुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सोनू सूद शर्टलेस दिसत आहे. तसेच हेल्मेटशिवाय तो स्पिती व्हॅलीमध्ये बाईक चालवत आहे.

सोनू सूदच्या या बाईक राइडमुळे हिमाचल प्रदेशातील लाहौल पोलीस आता सतर्क झाले आहेत आणि त्यांनी सोनू सूद विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याता इशारा दिला आहे. सोनू सूदचा स्पिती व्हॅलीमध्ये बाईक चालवतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लाहौल स्पिती पोलिसांनी त्यांच्या अधिकृत x हँडलवर एक नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लाहौल स्पिती जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. कायद्यानुसार आवश्यक असलेली कारवाई जिल्हा पोलिसांकडून केली जाईल."

तसेच पोस्टमधून पोलिसांनी पर्यटकांना एक आवाहन केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "पर्यटकांनी सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल." पोस्टमधून मिळेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ 2023 चा आहे. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे बेकायदेशीर आहे आणि सोनू सूदने असे करून हा कायदा मोडला आहे.

सोनू सूदच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तो स्पिती व्हॅलीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एका बाईक ग्रुपसोबत शर्टलेस आणि हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहे. सध्या लाहौल-स्पिती व्हॅली सोनू सूदच्या या व्हिडिओच्या सत्यता पडताळत आहेत. त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DDA Housing Scheme : राजधानीत फक्त १० लाखांत आलिशान घर, DDA ची हाऊसिंग स्कीम लॉन्च, वाचा सविस्तर

ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस, खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांमध्ये शाब्दिक राडा, रात्री नेमकं काय घडलं? VIDEO

Mawa Peda Modak Saran : माघी गणेशोत्सवासाठी बनवा मावा अन् पेढ्यांपासून मोदकांचे सारण, लगेच नोट करा रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल

Mitali Mayekar Mangalsutra: ट्रेडिशनल ते वेस्टर्न, प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल मिताली मयेकरच्या मंगळसूत्राच्या डिझाइन

SCROLL FOR NEXT