Sonu Sood Helps Indian Man Who Stuck In Thailand, Sonu Sood Latest Marathi News Twitter/@SonuSood
मनोरंजन बातम्या

Sonu Sood : केवळ एका ट्विटवर पाठवली मदत; रियल लाईफ हिरोची आणखी एक कामगिरी

Sonu Sood Helps Indian Man Who Stuck In Thailand : सोनूने सर्वतोपरी मदत करत रील लाईफप्रमाणेच तो रियल लाईफ हिरो असल्याचं त्यानं दाखवून दिलं आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि आता ज्याची रियल लाईफ हिरो म्हणून ओळख आहे असा नायक सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयासह त्याने कोरोना काळात केलेल्या कामगिरीसाठीही ओळखला जातो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona First Wave) परप्रांतीय मजदूरांना घरी पाठवणं असू देत किंवा त्याच्या जेवणाची व्यवस्था असू देत, सोनूने सर्वतोपरी मदत करत रील लाईफप्रमाणेच तो रियल लाईफ हिरो असल्याचं त्यानं दाखवून दिलं आहे. नुकतंच त्याने आणखी एक कौतुकास्पद काम केलंयं. थायलँडमध्ये अडकलेल्या एका भारतीय तरुणाला सोनू सूद याने परत मायदेशी आणलं आहे. केवळ एका ट्वीटच्या माध्यमातून सोनू सूद याने ही मदत केली आहे, तो मदतीसाठी आजही तयार असल्याचं त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. (Sonu Sood Helps Indian Man Who Stuck In Thailand, Send Flight Tickets Tweet Video Viral)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल खान नावाचा भारतीय तरुण रोजगारासाठी थायलँडमध्ये गेला होता. मात्र, याठिकाणी त्याची फसवणूक झाली. परिवारापासून आणि मायदेशापासून दूर असलेला साहिल थायलँडमध्ये एकटा पडला होता. साहिलाला थायलँड सोडायचे होते कारण, परदेशात त्यांची फसवणूक झाली. कंपनीने साहिलचा पासपोर्ट काढून घेतला होता त्यामुळे त्याला भारतात परतणं कठीण झालं होतं. त्याने भारत सरकारकडे मदत मागितली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर साहिलने ११ जूनला आपली समस्या ट्वीटरवर मांडली आणि अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदतीचा हात मागितला. सोनू सूदने हे ट्वीट पाहिले आणि तात्काळ ट्विटला उत्तर दिले की, मी तिकिटे पाठवत आहे, लवकरच परिवाराशी भेट होईल. (Sonu Sood Latest Marathi News)

सोनूच्या ट्विटनंतर अवघ्या काही तासांमध्ये साहिलला मदत मिळाली. यानंतर २ दिवसांत म्हणजे १३ जूनला, साहिल खान भारतात दाखल झाला. सोनू सूदच्या मदतीनंतर साहिल मायदेशी परतला होता. यावेळी साहिलने विमानतळावरून ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि मदतीबद्दल सोनू सूदचे आभार मानले. साहिलने व्हिडिओमध्ये सांगितलं की, त्याने भारत सरकारकडेही मदत मागितली होती पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तो पुढे म्हणाला की त्याला सूदकडून आशा होत्या आणि आता तो आपल्या कुटुंबाला भेटू शकेल.

भारतात आल्यावर साहिलला खूप आनंद झाला. साहिलने लिहिले, "शेवटी भारतात पोहोचलो 🇮🇳 शब्द नाहीत. मी तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करेन सोनू सूद सर आणखी यश मिळवा. तुम्ही माझ्यासाठी जे केले ते आजकाल कोणीही करत नाही. #realsavior #RealHero". साहिलच्या या ट्विटला सोनूने उत्तर दिलं की, "हिंदुस्थानी भाई हो हमारे, वापिस हिंदुस्तान लाना ही था "(तू माझा भारतीय भाऊ आहेस, तुला परत आणावे तर लागणारच होते)" सोनू सूदच्या या कामगिरीवने त्याच्यावर पुन्हा एकदा कौतुकांचा वर्षाव होतोय. सोनू सध्या सध्या दक्षिण आफ्रिकेत रोडीज होस्ट करत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT