LinkedIn आणि UN Women ची मोठी घोषणा; भारतातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार

५४.६ टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत ४१.३ टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते.
LinkedIn & UN Women
LinkedIn & UN WomenSaam TV
Published On

LinkedIn & UN Women : लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने आज मोठी घोषणा केली आहे. लिंक्‍डइन महिलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या तीन वर्षाच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये ५००,००० डॉलर्सची (३.८८ कोटी रूपये) गुंतवणूक करणार आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्‍पाला भारतातील महाराष्‍ट्रामधून सुरूवात होईल. हा प्रकल्‍प २,००० महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट व रोजगारक्षम कौशल्‍यांना निपुण करेल आणि त्‍यांना रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे व पीअर-टू-पीअर नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून करिअर घडवण्‍याची संधी देईल. इतकंच नाही तर, हा सहयोग महिलांना डिजिटली अपस्किल करण्‍यासोबत रोजगारांची अधिक उपलब्‍धता देईल आणि औपचारिक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये पूर्णपणे सहभाग घेण्‍यास सक्षम करेल.

LinkedIn & UN Women
चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत 'या' तारखांना असणार मेगाब्लॉक

आशिया-पॅसिफिक प्रदेशातील लैंगिक-संबंधित तंत्रज्ञान धोरणनिर्मितीचे निराकरण करणे हे आशियामध्‍ये महत्त्वाचे आहे. ५४.६ टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत ४१.३ टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते. यामधून ३२ टक्‍के लैंगिक पोकळी दिसून येते. इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियन (आयटीयू)च्‍या मते, २०१३ ते २०१७ दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी १७ टक्‍क्‍यांवरून २४ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. महिला आणि मुलींना अनेकदा शिक्षण किंवा पुरूष व मुलांप्रमाणे शिक्षण मिळत नाही. कधी-कधी त्‍यांना कमी डिजिटल कौशल्‍ये, साक्षरता आणि परिणामत: वाढत्‍या डिजिटल युगामध्‍ये कमी आर्थिक संधी मिळतात.

खरेतर, कोविड-१९ च्‍या विषम प्रभावामुळे गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये महिला व मुलींसाठी या संधीमधील पोकळीमध्‍ये वाढ झाली आहे. या सहयोगासह लिंक्‍डइन व यूएन विमेन ही पोकळी भरून काढण्‍यासाठी एकत्र काम करेल. त्‍यांचा प्रदेश व जगाला कर्मचारीवर्गामध्‍ये सुधारित लैंगिक समानता संपादित करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. या सहयोगाला विमेन्‍स एम्‍पॉवरमेंट प्रिन्सिपल्‍स (डब्‍ल्‍यूईपी)चे मार्गदर्शन मिळेल. डब्‍ल्‍यूईपी हा प्रभावी, कृतीशील तत्त्वांचा संच आहे, जो व्‍यवसायांना कार्यस्‍थळी, बाजारपेठेत आणि समुदायामध्‍ये लैंगिक समानता व महिला सक्षमीकरणाला कशाप्रकारे चालना द्यावी याबाबत मार्गदर्शन करतो.

LinkedIn & UN Women
वरुण-कियारा जोडीला मेट्रोत वडापाव खाणं पडलं महागात; जाणून घ्या प्रकरण

"अधिकाधिक व्‍यवसाय व व्‍यावसायिक लैंगिक समान कार्यस्‍थळांचे लाभदायी परिणाम ओळखू लागले असल्‍याने आम्‍हाला महिलांना आजच्‍या डिजिटल युगामध्‍ये अधिक रोजगारक्षम व उद्योजक बनण्‍यास मदत करण्‍याची अद्वितीय संधी मिळाली आहे. आम्‍हाला यूएन विमेनसोबत सहयोग करत महिलांचे अपस्किलिंग व आर्थिक सक्षमीकरणामध्‍ये गंतवणूक करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रदेशाच्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये महिला प्रतिनिधित्‍व व व्‍यावसायिक विविधता सुधारण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. महिलांना योग्‍य कौशल्‍ये व संसाधने देत आम्‍ही अधिक समान व सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा करतो," असे लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता (Ashutosh Gupta, India Country Manager, LinkedIn) म्‍हणाले.

यूएन विमेन आणि लिंक्‍डइन सहयोगींना महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणासह पाठिंबा देण्‍याचे आवाहन करण्‍यासाठी लिंक्‍डइन व्‍यासपीठ व संस्‍थात्‍मक कौशल्‍यांचा लाभ घेतील. सहयोगाने ते संयुक्‍त सल्‍लामसलत मोहिमा व इव्‍हेण्‍ट्स राबवतील, तसेच त्‍यांच्‍या संबंधित नेटवर्क्‍समधील प्रमुख सहयोगींना कार्यस्‍थळामध्‍ये पुरूष व महिलांसाठी व्‍यापक समान संधी व निष्‍पत्ती संपादित करण्‍याचे आवाहन करतील. तसेच यूएन विमेन त्‍यांच्‍या सहयोगांचा लाभ घेत तरूण महिलांना उद्योगांमध्‍ये सुलभ संधी देईल, जेथे त्यांचे लिंक्‍डइन व्‍यासपीठ ऑपरेट करण्‍यावर आणि कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.

LinkedIn & UN Women
प्रतीक्षा संपली! रणबीर आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

"महिला व मुलींना उत्तम रोजगार व उद्योजक संधी मिळण्‍याकरिता दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. लिंक्‍डइनसोबत सहयोगाने लिंक विमेन प्रकल्‍पाचा महिलांचा समूह तयार करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे महिला नवीन डिजिटल व रोजगारक्षम कौशल्‍ये आत्‍मसात करतील आणि त्‍यांना उत्तम रोजगार मिळतील", असे यूएन विमेन इंडियाच्‍या देशातील प्रतिनिधी सुझान फर्ग्‍युसन म्‍हणाल्‍या. हा उपक्रम सुरू केल्‍याच्‍या १५-महिन्‍यांनंतर यूएन विमेन व लिंक्‍डइन आवश्‍यक असल्‍यास उपक्रमांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी अवलत केलेले धडे व मूल्‍यांकनात्‍मक अभिप्रायाचा समावेश करतील आणि त्‍यानंतर इतर आशिया-पॅसिफिक देशांमध्‍ये विस्‍तार करतील.

यूएन विमेन बाबत:

यूएन विमेन लैंगिक समानता व महिलांच्‍या सक्षमीकरणाप्रती समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी आहे. यूएन विमेनचे भारतातील कार्यालय नवी दिल्‍लीमध्‍ये आहे आणि ते राष्‍ट्रीय मानके स्‍थापित करण्‍यासाठी, तसेच त्‍यांचे उपक्रम, सार्वजनिक सल्‍लामसलत, संशोधन व विचारशील नेतृत्‍वाच्‍या माध्‍यमातून खालील धोरणात्‍मक निष्‍पत्ती संपादित करण्‍यासाठी सर्व विभागांमधील सहयोगींसोबत काम करतात.

• महिलांना शासकीय यंत्रणांमध्‍ये नेतृत्‍व करण्‍यास, सहभाग घेण्‍यास आणि त्‍यामधून समान लाभ मिळवण्‍यास, तसेच सर्व प्रकारच्‍या लिंग-आधारित हिंसेपासून मुक्‍त असे जीवन जगण्‍यास मदत करणे.

• महिलांना उत्‍पन्‍न सुरक्षितता, सर्वोत्तम काम व आर्थिक स्‍वायत्तता असण्‍याची आणि वंचित महिलांसह तरूण महिलांना दर्जेदार शिक्षण, उद्योजकता व रोजगार मिळण्‍यासोबत त्‍यामध्‍ये सहभाग घेण्‍याची उपलब्‍धता असण्‍याची खात्री घेणे, आणि सर्व महिला व मुलींना लैंगिक समानता आणि महिला व मुलींच्‍या सक्षमीकरणाला चालना देणारे सर्वसमावेशक व गतीशील नियम, धोरणे व मानकांच्‍या अंमलबजावणीचा लाभ मिळत असल्‍याची खात्री घेणे.

• यूएन विमेन भारतातील महिला-नेतृत्वित विकासाची जाणीव करून देण्‍यासाठी भारत सरकार, इतर यूएन एजन्‍सीज, नागरी समाज, महिला व युवा संघटना, प्रसारमाध्‍यमे, खाजगी क्षेत्र व प्रभावकांसोबत सहयोगाने काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com