Sonu Nigam Post Sonu Nigam Instagram
मनोरंजन बातम्या

Sonu Nigam: समाजात काही लोक...; सोनू निगमविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर, म्हणाला...

Sonu Nigam Post: गायक सोनू निगमवर बंगळुरूच्या अवलहळ्ळी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका संगीत कार्यक्रमात त्याच्या वक्तव्यमुळे लोकांच्या भावना दुखावल्या होत्या.

Shruti Vilas Kadam

Sonu Nigam Post: गायक सोनू निगमवर बंगळुरूच्या अवलहळ्ळी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. २५-२६ एप्रिल २०२५ रोजी ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे झालेल्या एका संगीत कार्यक्रमात, काही प्रेक्षकांनी त्याला कन्नड गाणं गाण्याची विनंती केली. त्यावर प्रतिक्रिया देताना, सोनू निगमने "याच कारणामुळे पहलगाममध्ये जे घडलं, ते घडलं" असं वक्तव्य केलं, त्यामुळे कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. या वक्तव्यामुळे कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे .

या प्रकरणावर बोलताना सोनू निगम म्हणाला, मी कन्नडसह विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मी जेव्हा जेव्हा कर्नाटकात येतो तेव्हा मला खूप प्रेम आणि आदर मिळतो. तुम्ही सर्वांनी मला कुटुंबासारखे वागवले आहे, मी विनंती केल्यावर नेहमीच कन्नड गाणी गातो. त्या तरुणाच्या जन्मापूर्वी मी कन्नडमध्ये गातोय. पण ते ज्या पद्धतीने 'कन्नड, कन्नड' असे ओरडत होता ते मला आवडले नाही. अशा वागण्यामुळेच पहलगाम हल्ल्यासारख्या घटना घडतात, त्या चार ते पाच लोक मला विनंती नाही तर धमकी देत होते आणि म्ह्णून त्यांना ते चुकत आहेत याची आठवण करून देणे महत्त्वाचे होते, अशी लोक समाजासाठी मूळव्याध असतात ज्यांच दुखणं आपल्याला सहन करावं लागत" असे गायक हिंदीत म्हणाला.

या प्रकरणावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी सोनू निगमच्या वक्तव्याची निंदा केली आहे, तर काहींनी त्याच्या समर्थनार्थ मत व्यक्त केलं आहे. कर्नाटकातील काही संघटनांनी त्याच्याकडून सार्वजनिक माफीची मागण्याची मागणी केली. आणि तोपर्यंत राज्यात त्याचे कार्यक्रम न करण्याचा इशारा दिला आहे .

सोनू निगमवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२(१), ३५२(२) आणि ३५३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्यात सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल अशा हेतूने केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा समावेश आहे . या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT