Sonali Bendre Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonali Bendre: कर्करोगावर मात करणाऱ्या सोनालीला दोनदा न्यू यॉर्कला भेटायला गेला 'हा' अभिनेता; आठवण सांगताना भावूक झाली अभिनेत्री

Sonali Bendre: सोनाली बेंद्रेने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ती न्यू यॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत होती, तेव्हा सलमान खान तिला दोनदा भेटायला आला होता.

Shruti Vilas Kadam

Sonali Bendre: 2018 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना मेटास्टेटिक कर्करोग झाला. उपचारासाठी सोनाली न्यूयॉर्कमध्ये गेली होती, ज्या कठीण क्षणात त्यांच्या कुटुंबासोबतच, संपूर्ण इंडस्ट्रीने साथ दिली मात्र, या काळातील एक अत्यंत खास भूमिका निभावणारा होता, बॉलिवूडचा दबंग सलमान खान. सोनालीने नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला की सलमानने कर्करोगाच्या उपचारा दरम्यान दोन वेळा न्यूयॉर्कला भेटायला गेला होता.

सलमान खान सोनालीला भेटण्यासाठी अमेरिकेत पोहोचला होता

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने सांगितले की सलमानलाही एक दयाळू बाजू आहे. तो दोनदा न्यूयॉर्कला आला होता आणि तिच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान तिला भेटला होता. तो डॉक्टरांसोबत बोलून माहिती घेत असे. त्याने त्याच्याकडून योग्य डॉक्टरचा सल्लाही दिला.

तो अभिनेत्रीचा पती गोल्डी बहलला फोन करून अभिनेत्रीच्या तब्येतीची विचारपूस करत होता. जेव्हा सलमानला कळले की उपचार चांगले सुरू आहेत आणि सोनाली बरी होत आहे, तेव्हा तो शांत झाला. सलमानने त्यावेळी सोनालीच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याची भूमिका साकारली होती.

सोनालीला कर्करोग होता

२०१८ मध्ये सोनालीने एक पोस्ट शेअर करून माहिती दिली होती की ती कर्करोगा झाला आहे. अमेरिका आणि भारतात उपचार घेतल्यानंतर तिने आता कर्करोगावर मात केली आहे. पण त्यावेळी तिने तीन वर्षे यातना सहन केल्या होत्या. अभिनेत्रीने ही लढाई धैर्याने लढली. संपूर्ण इंडस्ट्री तिच्यासोबत उभी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

SCROLL FOR NEXT