Marathi Celebrities Ashadhi Ekadadsi Special Looks Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Celebrities Ashadhi Ekadashi : विठुरायाच्या भक्तीत लीन, मराठी कलाकारांची आषाढी एकादशीनिमित्त खास पोस्ट

Marathi Celebrities Post For Ashadhi Ekadashi : मराठी कलाकारांनी देखील विठुराया आणि वारकऱ्यांसाठी पोस्ट केल्या आहेत.

Pooja Dange

Sonalee Kulkarni, Kushal Badrike Post On Ashadhi : आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वच विठुरायाच्या भक्तीत दंग झाले आहेत. तर या सगळ्या मराठी कलाकारांनी देखील विठुराया आणि वारकऱ्यांसाठी पोस्ट केल्या आहेत. काही कलाकारांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत तर काहींनी त्यांचे रूप धारण केले आहे. चला मग नजर टाकूया विठ्ठल-रुख्मिणीच्या भक्तीत रंगलेल्या सेलेब्रिटींवर.

कुशल बद्रिके

कुशल बद्रिकेने विठ्ठल- रुख्मिणीचा फोटो करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पोस्ट करत हिले आहे की, 'अख्खी वारी करून ‘वारकरी’ नुसतं कळसाच्या पाया पडून परततात आणि मग लोक “विठ्ठल” म्हणून त्या वारकऱ्याच्याच पाया पडतात. ज्या वारकऱ्याने वारीत “प्रत्यक्ष” विठ्ठलाचं दर्शनच घेतलं नाही, तो स्वतःच “विठ्ठल” होऊन परततो . आणि इकडे रखुमाईच्या जन्माला येऊनही “विठ्ठल” नशिबात नसतो. दैवं सुद्धा कधी कधी कळसच गाठतं. नाही का ? असो… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.' (Latest Entertainment News)

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील विठ्ठलाच्या भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक जुना व्हिडिओ शेअर करत सोनालीने तिच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. सोनाली लिहिले आहे की, 'दरवर्षी प्रमाणे, गेले काही दिवस चिमुकल्या रखुमाईंचे #reels पाहिले. फारच nostalgic वाटलं, म्हणून माझं हे सादरीकरण शोधून काढलं आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमच्याबरोबर share करावंसं वाटलं….

जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥

तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥

आज आषाढी एकादशीच्या या पवित्र पर्वामध्ये पंढरीच्या श्री पांडुरंगाला एकच मागणे, हे विठुराया!”

राज्यात पाऊसपाणी चांगला होऊ दे.

शेतकऱी बांधवांच्या शेती-शिवारात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. सर्वांना उत्तम आरोग्य लाभूदे! आषाढी एकादशी निमित्त आपनास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...'

शशांक केतकर

अभिनेता शशांक केतकरने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याची ऑन-स्क्रीन पत्नी रामासोबत दिसत आहे. रामाने नऊवारी नेसली आहे आणि तिच्या डोक्यावर तुळशी वृंदावन देखील आहे. तर शशांकने धोतर नेसलेअसून हातात टाळ, डोळ्यावर टोपी, कपाळावर गांड लावून भजन म्हणत चालत. तसेच शशांकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'माऊली या जगावर तुझे आशिर्वाद राहूदे.'

महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त आज पंढरपूरात दाखल होतात. आषाढी वारीसाठी पायी निघालेले वारकरी आज अखेर त्यांच्या विठूरायाच्या चरणी लीन होतील. आयुष्यात एकदा तरी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्याच्या पायाशी जावं अशी सर्वांची इच्छा असते. वर्षानुवर्ष वारीला जाणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या विठूरायाचं दर्शन घेण्याची ओढ असते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT