Sonalee Kulkarni  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Sonalee Kulkarni-Dipika Kakar Meet : सोनाली कुलकर्णी आणि दीपिका कक्कर यांची भेट झाली आहे. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या दोघांचे नेमकं नाते काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कायम तिच्या कामामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहेत. नुकतीच सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनाली कुलकर्णी खूप वेळानंतर आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटली आहे. ही मैत्रिणी दुसरी-तिसरी कोणी नसून टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आहे.

दीपिकाने अलिकडेच तिला स्टेज-2 कर्करोग झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. मात्र आता तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तिची तब्येत ठीक असल्याचे तिने सांगितले. दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या दोघी एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. याला दीपिकाने खास कॅप्शन दिलं आहे. तर तिची स्टोरी रिपोस्ट करत सोनालीने देखील आपले प्रेम व्यक्त केले आहे.

दीपिका कक्कर पोस्ट

"सोनाली आणि दीपिका KV1 देहू रोडपासून आतापर्यंत... काही नाती कधीच बदलत नाहीत, काळजी, प्रेम, उबदारपणा कधीच बदलत नाही... आपण कितीही वेळा भेटलो तरी... बंधन तसेच आहेत! कायम माझ्यासोबत राहण्यासाठी सोनाली खूप धन्यवाद... तुला खूप प्रेम..."

dipika kakar

सोनाली कुलकर्णी पोस्ट

"प्रेम

मला तुझा खूप अभिमान आहे...तू चीअरलीडर आहेस. "

या फोटो आणि कॅप्शनवरून असे दिसून येते की सोनाली कुलकर्णी आणि दीपिका कक्कर खूप जुन्या मैत्रीणी आहेत. दोघींना एकत्र पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

sonalee kulkarni

सोनाली कुलकर्णी वर्कफ्रंट

सोनाली कुलकर्णीला 'महाराष्ट्राची अप्सरा' म्हणून ओळखले जाते. तिने आजवर मितवा, धुरळा, हंपी, झिम्मा, बकुळा नामदेव घोटाळे, नटरंग असे गाजलेले चित्रपट केले आहेत. ती सोशल मीडियावर कायम आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो टाकत असते. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT