Dahaad Teaser Twitter
मनोरंजन बातम्या

Dahaad Teaser Out: सोनाक्षी सिन्हाचा OTT डेब्यू, 'दहाड'चा टीझर आऊट, या प्लॅटफॉर्मवर येणार वेब सीरीज

Sonakshi Sinha OTT Debut: सोनाक्षी ओटोटीवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली असून सोनाक्षीच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Sonakshi Sinha Dahaad Teaser: सोनाक्षी सिन्हा नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे सर्वत्र चर्चेत असते. सलमान खानसोबतच्या 'दबंग' या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत सोनाक्षी सिन्हाने नेहमीच आपल्या अभिनयाची चुनूक चाहत्यांना लावली आहे. सध्या, सोनाक्षी ओटोटीवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'दहाड'मध्ये सोनाक्षीचा फायर लूक सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सोनाक्षीच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने त्यांच्या आगामी वेब सीरिजचा धमाकेदार टीझर शेअर केला आहे. क्राईम ड्रामा शोचे एकूण ८ भाग आहेत. 'दहाड'च्या टीझरची सुरुवात 27 महिलांच्या खुनाच्या रहस्याने होते. या खुनांची ना कोणी तक्रार दाखल केली आहे, ना कोणी साक्षीदार आहे. यानंतर सोनाक्षी सिन्हा पोलिसांचा गणवेशात एन्ट्री मारते. या वेबसीरिजमध्ये पोलिस ऑफिसर अंजली भाटिया म्हणजेच सोनाक्षीने या २७ महिलांच्या मृत्यूची गुंतागुंतीची गाठ सोडवण्याची जबाबदारी घेतली आहे. पोलिसाच्या वर्दीत सोनाक्षी खूपच शोभून दिसते. (OTT)

' दहाड'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. रीमा कागती आणि झोया अख्तर निर्मित 'दहाड' वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. 'दहाड'मध्ये सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'दहाड' चा टीझर शेअर करत ट्रेलरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. येत्या ३ मे पासून ही वेबसीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. (Web Series)

सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत डबल एक्सएल या चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरला.  दुसरीकडे, सोनाक्षी आता 'दहाड'मधून नव्या अवतारात डिजिटल पदार्पण करत आहे. या मालिकेकडून निर्मात्यांना खूप आशा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT