Son Of Sardaar 2 VS Dhadak 2 collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Son Of Sardaar 2 VS Dhadak 2 collection : अजय देवगन अन् सिद्धांत चतुर्वेदीमध्ये कांटे की टक्कर, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?

Son Of Sardaar 2 VS Dhadak 2 : सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' आणि सिद्धांत चतुर्वेदीचा 'धडक २' एकमेकांना कांटे की टक्कर देत आहेत. पहिल्या दिवशी कोणी किती कलेक्शन केले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉक्स ऑफिसवर 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.

'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' ने पहिल्या दिवशी कोटींची कमाई केली आहे.

'सन ऑफ सरदार २' हा कॉमेडी ड्रामा तर 'धडक २' ही प्रेमकथा आहे.

सध्या प्रेक्षकांना मराठी, हिंदी चित्रपटांची बंपर मेजवानी पाहायला मिळत आहे. 'सैयारा'चे क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. अशात आता बॉक्स ऑफिसवर आणखी दोन चित्रपटाने एन्ट्री मारली आहे. काल (1 ऑगस्टला) शुक्रवारी 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर अजय देवगन आणि सिद्धांत चतुर्वेदीमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे.

'सन ऑफ सरदार 2'

अजय देवगन (Ajay Devgn) आणि मृणाल ठाकुरची (Mrunal Thakur) जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'सन ऑफ सरदार 2' (Son Of Sardaar 2) चित्रपटात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. 'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या ' सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर , नीरू बाजवा, विंदू दारा सिंह, रवी किशन आणि शरत सक्सेना हे कलाकार झळकले आहेत.

'सन ऑफ सरदार 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

अजय देवगन आणि मृणाल ठाकूरच्या 'सन ऑफ सरदार २' चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.75 कोटींची कमाई केली आहे. 'सन ऑफ सरदार 2' ने 'धडक 2'ला तगडी टक्कर दिली आहे.

'धडक 2'

'धडक 2'मधून (Dhadak 2) सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'धडक 2' मध्ये सिद्धांत आणि तृप्ती रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. 'धडक 2' चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इकबाल हिने केले आहे. 'धडक 2' हा रोमँटिक ड्रामा आहे. 'धडक 2' हा चित्रपट 2018 साली रिलीज झालेल्या 'धडक'चा सीक्वल आहे.

'धडक 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'धडक 2' ही प्रेमकथा आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या चित्रपटाने संथ सुरूवात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने 3.35 कोटींचा व्यवसाय केला आहे. अजय देवगनच्या 'सन ऑफ सरदार 2' ने सिद्धांत चतुर्वेदीच्या 'धडक 2' ला मागे टाकले आहे. वीकेंडला चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'सन ऑफ सरदार 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

6.75 कोटी

'धडक 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

3.35 कोटी

'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' कधी रिलीज झाला?

1 ऑगस्ट

'सन ऑफ सरदार 2' मध्ये मुख्य भूमिकेत कोण आहे?

अजय देवगन- मृणाल ठाकुर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT