Malaika Arora and Arjun Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: मलायका प्रेग्नंट असल्याची सोशल मीडियावर चर्चा; अर्जुन भडकला, म्हणाला,"आमच्या वैयक्तिक ...'

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन या जोडीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. असं वाचत असताना तुम्हाला देखील आश्चर्यकारक वाटेलच मात्र यावरती आता अर्जुन कपूरची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

माहितीनुसार, अलीकडेच सोशल मीडियावर मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याचबरोबर अर्जुन कपूरच्या पहिल्या मुलाची ती आई होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत. दरम्यान, अर्जुन कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर मलायकासोबतचा फोटो शेअर करत प्रेग्नंसीच्या चर्चांना पुर्णविराम देत ह्या खोट्या अफवा असल्याचे सांगितले आहे.

एका मुलाखतीत अर्जन कपूर म्हणाला, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. अशा बातम्या सातत्याने पसरवल्या जात असतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण त्या मीडियात पसरतात आणि एकप्रकारे सत्याचा भाग बनतात. यांचाच प्रचंड राग येतो. पुढे अर्जुन म्हणाला, "आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका."

अर्जुन कपूर आणि मलायका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करताना समोर आले आहेत. अर्जुनला डेट करण्यापूर्वी मलायकाने बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते, मात्र २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आहे.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT