Urfi Javed Death Threat Instagram
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Death Threat: ‘तो’ व्हिडीओ डिलीट कर, अन्यथा... अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Urfi Javed Fashion: उर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके फॅशन करणं अंगलट आले आहे. फॅशनमुळे उर्फीला इमेलच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

सुरज सावंत

Urfi Javed Recreated Rajpal Yadav Look In Bhool Bhulaiyaa

अभिनेत्री उर्फी ही तिच्या फॅशन आणि अतरंगी स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. उर्फी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अनेकदा उर्फीला नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील केलं जातं. दरम्यान, अगदी दोन दिवसांपूर्वी उर्फीने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इन्स्टाग्रावर शेअर केलेला व्हिडीओ डिलीट कर, अन्यथा जीवे मारू, असा धमकीचा ई-मेल उर्फी जावेदला एका अज्ञात व्यक्तीकडून आला आहे. उर्फीने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. जर ती व्हिडीओ डिलीट केली नाही तर तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. अभिनेत्री आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, “या देशामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे मला धक्का बसला आहे. मी चित्रपटातले एक पात्र पुन्हा साकारल्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.” सोबतच पुढे तिने मेलचे स्क्रिनशॉट सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. (Actress)

तिला पहिला मेल निखिल गोस्वामी या नावाने आला आहे. “तु जो व्हिडीओ अपलोड केला आहे, तो व्हिडीओ तू डिलीट नाही केला तर अन्यथा तुला जिवे मारायला वेळ लागणार नाही.” असा आशय त्या मेलमध्ये आहे. तर दुसरा मेल रुपेश कुमार नावाने तिला आला आहे. “उर्फी तू आमच्या हिंदू धर्माची बदनामी करतेय. तुझं आयुष्य चांगल्यापद्धतीने जग नाहीतर अवघड होईल. कोणीही तुला वाचवायला येणार नाही.” तर असा आशय दुसऱ्या मेलमध्ये आहे. (Social Media)

राजपाल यादवने ‘भूल भुलैया’ चित्रपटामध्ये एका पंडिताचे पात्र साकारले होते. अगदी सेम टू सेम तसाच गेटअप तिने केला आहे. खरंतर तो गेटअप तिने हॅलोविन पार्टीसाठी केला होता. व्हिडीओमध्ये उर्फीने, लाल रंगाचं फुल स्लीव्हज असलेला बॉडी फिट टॉप घातला आहे.

तर त्याखाली भगव्या रंगाचं धोतर घातलं आहे. गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार, केसामध्ये पेटती अगरबत्ती लावली आहे. या सगळ्यामध्ये, उर्फीचा चेहरा फारच विनोदी दिसतोय. तिने संपूर्ण चेहऱ्याला लाल रंग लावला आहे. भुवया देखील डार्क केल्या आहेत आणि अगदी छोट्या- छोट्या मिश्याही लावल्या आहेत.

राजपाल यादवच्या लूकपेक्षा जास्त विनोदी दिसत आहे. उर्फीने तो उत्तमरीत्या कॅरी देखील केला आहे. पण आता हाच लूक तिच्या अंगलट आला आहे. उर्फी नेहमीच आपल्या विचित्र आणि भन्नाट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. खरंतर ती या आधी सुद्धा आपल्या लूकमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. (Entertainment News)

Edited By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

SCROLL FOR NEXT