सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कायमच चर्चेच्या अग्रस्थानी असते. ती नेहमीच सोशल मीडियावर परखड मत मांडण्याचा प्रयत्न करत असते. अंकिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत, टोल नाक्यावरील घडलेल्या प्रकाराबद्दल भाष्य केले आहे. व्हिडीओमध्ये तिच्याकडून वाशी टोल नाक्यावर दोनदा पैसे घेतल्याचे तिने सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने टोल नाक्याच्या कारभारावर भाष्य केले आहे.
‘टोल का झोल’ असं कॅप्शन देत अंकिता वालावलकरने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केलेला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणते, "२६ मार्च २०२४ रोजी मी मालवण ते मुंबई असा प्रवास करत होते. मी वाशी टोलनाक्याजवळ आल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की, तुमच्या फास्टॅग स्कॅन होत नाहीये, तर तुम्हाला कॅश पेमेंट करावं लागेल. कॅश पेमेंट केल्यानंतर त्यांनी मला रिसिप्ट दिली. पण मी मुंबईमध्ये आल्यानंतर माझ्या फास्टॅगच्या अकाऊंटवरून दुसऱ्यांदा पैसे कट झाल्याचा मला मॅसेज आला."
"त्या मॅसेजमध्ये त्यांनी टोल फ्री नंबरही दिलेला होता. त्यावर मी चार ते पाच दिवस संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला,पण मला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. मी म्हणाले की, जाऊदे काय त्या ४५ रुपयांचा विचार करायचा, कशाला उगाच थोड्या पैशांसाठी आपला वेळ फुकट घालवायचा. पण अशा अनेक लोकांनी असेच ४५ रुपये सोडले तर काय होईल ? असा प्रश्न मला पडला. म्हणून मला या विषयावर बोलण्याची गरज वाटली, म्हणून मी हा व्हिडीओ बनवला आहे."
"जेव्हा राज ठाकरे टोलच्या मुद्द्यावर बोलत असतात, त्यावेळी त्यांना अनेकजण बोलतात की, तुमच्याकडे फक्त टोल हाच मुद्दा आहे का? दुसरा कोणता मुद्दा नाही का? पण हा मुद्दा खरंच खूप गंभीर आहे. पण ह्या टोलमधले हे झोल आहेत, ते तुम्ही व्यवस्थित पाहायला हवे. सर्वांनीच या मुद्द्याकडे गांभीऱ्याने पाहायला हवं." यावेळी अंकिताने चाहत्यांना जागरूक राहण्यास सांगितले आहे. त्यासोबतच अंकिताने 'भारत चंद्रावर पोहोचला पण तुमचे स्कॅनर नीट नाहीत.' असं म्हणत टोल नाक्याच्या कारभारावर टीका केलेली आहे.
अंकिताच्या ह्या व्हिडीओवर अनेकांनी आमच्यासोबतही असा प्रकार अनेकदा घडल्याचे काही युजर्स म्हणालेले आहेत. तर काहींनी ‘टोल- झोल’अशीही प्रतिक्रिया दिलेली आहे. 'हा नवीन स्कॅम सुरू झाला आहे. खूप जणांना हा अनुभव आलेला आहे.. हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.' अशी कमेंटही एका युजरने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.