Faisal Ansari on Puneet Superstar Saam Tv
मनोरंजन बातम्या

FIR On Puneet Superstar: बिग बॉस ओटीटी फेम पुनीत सुपरस्टार अडचणीत; इन्फ्लुएन्सरने दाखल केली एफआयआर

Bigg Boss OTT 2 Puneet Superstar : बिग बॉस ओटीटी या शोमधून चर्चेत आलेला पुनीत सुपरस्टार अडचणीत आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Faisal Ansari on Puneet Superstar : बिग बॉस ओटीटी या शोमधून चर्चेत आलेला पुनीत सुपरस्टार अडचणीत आला आहे. पुनीत सुपरस्टारवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुनीतच्या स्वभावामुळे पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. याच कारणामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून देखील बाहेर काढण्यात आले आहे.

बिग बॉसमधील पुनीतचा प्रवास २४ तासात संपला. त्याच्या वागण्यामुळे त्याला घराबाहेर काढले होते. त्यामुळे तो भलताच चर्चेत आला होता. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच २४ तासाच्या आत एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले. पुनीतला बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर आता त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.(Latest Entertainment News)

मीडियाच्या एका वृत्तानुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अलीने पुनीतविरोधात एफआयआर दाखल केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत फैजानला पुनीतच्या वागणुकीबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्याने तो एक अत्यंत वाईट माणूस आहे असं त्याने म्हटलं. तसेच त्याच्या बोलण्या-वागण्याला पद्धत नाही असेही आरोप फैजनने केला. पुनीतची बिग बॉसच्या घरात राहण्याची लायकी नव्हती. त्या घरात चांगले आणि सुरक्षित कलाकार राहतात. फैजानची ही मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीनंतर फैजानला धमक्यांचे फोन येऊ लागले.

एका वृत्तानुसार, फैजानला सोशल मीडियावर धमक्यांचे मेसेज येत आहे. त्याचबरोबर मेल्सदेखील येत आहे. या धमक्यांच्या भीतीने फैजानने त्याच्या वकील मित्राशी बोलून पुनीत विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुनीतला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही केली आहे. यावर तो म्हणाला, 'मला अनेक प्रकारच्या धमक्या येत होत्या. पुनीत जर पुन्हा वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात गेला तर पोलिस त्याला पुन्हा बाहेर काढतील. सेलिब्रिटीविरोधात तक्रार केल्यास तो कोणत्याही शोचा भाग होऊ शकत नाही'.

कोण आहे फैजान अन्सारी

पुनीत सुपरस्टारप्रमाणेच फैजान अन्सारी देखील सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहे आणि तो अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या रियालिटी शो 'डेट बाजी'मध्ये दिसला आहे. सोशल मीडियावर त्याच्या मोठा चाहतावर्ग आहे. याशिवाय फैजान सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत फॅशन मॅगझिनसाठी काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farhan Akhtar: फरहान अख्तरने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार, वाचा राशीभविष्य

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

Dev Diwali 2025 date: कधी आहे देव दिवाळी? पृथ्वीवर येऊन देवता साजरी करणार दिवाळी, वाचा कथा

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

SCROLL FOR NEXT