Snehal Tarde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Snehal Tarde : एक अट अन् लग्नाला एका झटक्यात होकार, वाचा स्नेहल-प्रवीण तरडेची प्यार वाली लव्हस्टोरी

Pravin-Snehal Love Story : अभिनेत्री,दिग्दर्शक स्नेहल तरडेने आपल्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे. ज्यात तिने लग्नासाठी प्रवीण समोर एक मागणी केली होती.

Shreya Maskar

सर्वत्र गाजणारा 'फुलवंती' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री स्नेहल तरडे हिने केले आहे. या चित्रपटातून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. तसेच 'फुलवंती' स्नेहलने अभिनय देखील केला आहे.

अभिनेत्री स्नेहल तरडे (Snehal Tarde) ही अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांची बायको आहे. एका मिडिया मुलाखती दरम्यान लग्नावेळीचा एक किस्सा सांगितला आहे. लग्नाच्या वेळी प्रवीण तरडेकडे स्नेहलने एक गोष्ट मागितली होती.

मुलाखतीत स्नेहलला तू शुद्ध शाकाहारी आहेस का? असे विचारले त्यावर उत्तर देत स्नेहलने तो किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, "हो... मी पूर्णपणे शाकाहारी आहे आणि प्रवीण पूर्णपणे मांसाहारी आहे. मी किती प्रेमात होते त्याच्या हेही पाहिले नाही. तो किती कमवतोय याचही मला काही नव्हते. त्यामुळे मी प्रवीणसोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाच एक मागणी केली होती. की, तू कधीही मला आयुष्यात नॉन व्हेज खायला लावायचे नाही आणि हातही लावायला सांगायचा नाही. कारण माझी अशी धारणा आहे की, देवाने माझ्यावर अजून अशी वेळ आणलेली नाही की, एखाद्या जीवाला मारून मी माझे पोट भरेन. अशी माझी धारणा आहे."

यापुढे स्नेहल म्हणाली की, "देवाने आजवर अशी वेळ माझ्यावर आणली नाही. पण कधी आलीच तर मला नाइलाजाने खावे लागेल. आमच्या घरी मुळीच मांसाहार बनत नाही. प्रवीण ऑफिसमध्ये खातो."

'फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत गश्मीर महाजनी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर देखील जादू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT