Smriti Irani Ramp Walk Viral Video: लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी यांनी "क्यूंकी सास भी कभी बहू थी २" द्वारे अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण केले. या शोला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. जेव्हापासून स्मृती इराणी ग्लॅमरच्या जगात परतल्या आहेत तेव्हापासून त्या दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता, स्मृती इराणी यांनी रॅम्प वॉक करुन सर्वांना चकित केले असून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.
स्मृती इराणी अनवाणी रॅम्प वॉक केला
स्मृती इराणीने बॉम्बे फॅशन वीकमध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी जांभळ्या रंगाची साडी घातली. हलका मेकअप, लांब नेकलेस आणि सनग्लासेससह, स्मृतीचा लूक रॉयल दिसत होता. विशेष म्हणजे, अभिनेत्रीने उंच टाचांमध्ये नाही तर अनवाणी रॅम्प वॉक केला. चाहत्यांना ही त्यांची स्टाईल खूप आवडली आहे आणि सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे.
मॉडेलिंगनेच कारकिर्दीची सुरुवात
स्मृती इराणीने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगनेच केली होती. या काळात तिला टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या लवकरच एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली. आता, २६ वर्षांनंतर, त्या रॅम्पवर चालताना दिसली. स्मृती यांनी काही वर्षे अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला.
या स्टार्सनी फॅशन शोमध्येही सहभाग घेतला
स्मृती इराणी व्यतिरिक्त, दिव्यंका त्रिपाठी, युविका चौधरी, सनी सिंग, सुमोना चक्रवर्ती आणि सहेर बंबा यांनीही बॉम्बे फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला होता. मौनी रॉय देखील पारंपारिक पोशाखात रॅम्पवर चालताना दिसली. यावेळी तिचा लूक देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.