Smita Patil Death Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Smita Patil Birth Anniversary: यशाच्या शिखरावर असताना प्रेमात पडल्या अन्... स्मिता पाटील यांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं?

Smita Patil Life: स्मिता पाटील यांचा न्यूज रीडर ते अभिनेत्री बनण्याचा प्रवास खूप सुंदर होता.

Pooja Dange

Smita Patil Birth Anniversary Special:

अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज वाढदिवस आहे. स्मिता पाटील खूप कमी वयात हे जग सोडून निघून गेल्या. अवघ्या ३१ वर्षीय वयात स्मिता पाटील यांनी भरपूर लोकप्रियता मिळवली होती. त्यांची जागा अद्याप कोणीही घेऊ शकलेलं नाही.

स्मिता पाटील यांचा न्यूज रीडर ते अभिनेत्री बनण्याचा प्रवास खूप सुंदर होता. परंतु त्याचे वैयक्तिक जीवनात तितकेच वेदनादायक होते. स्मिता यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे होते. ज्याचे अनेक पैलू आहेत. आज स्मिता पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील काही पैलू उलघडूया.

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ साली झाला. त्यांचे वाढीला शिवाजीराव गिरधर पाटील नेते होते.तर त्यांची आई विद्याताई पाटील एक समाजसेविका होत्या. स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी बालकलाकार म्हणून नाटकात काम देखील केले आहे.

स्मिता पाटील यांनी त्यांच्या करियरची सुरुवात न्यूजकस्टार म्हणून केली. ७०च्या दशकात डी डी नॅशनलवर स्मिता न्यूज रीडर म्हणून काम करत होत्या. दरम्यान त्यावेळचे दिग्गज फिल्म मेकर श्याम बेनेगल यांची पाहण्यात स्मिता पाटील आल्या. श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांनी त्यांच्या 'चरणदास चोर' चित्रपटामध्ये संधी दिली. या चित्रपटापासूनचा स्मिता यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात झाली.

स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईंट ठरला 'मंथन' चित्रपट. या चित्रपटामुळे स्मिता पाटील यांचे नशीब पालटले. वूमन सेंट्रिक चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला. आणि येथून स्मिता पाटील यांचा हिंदी चित्रपटात स्वःताची ओळख निर्माण करण्याचा प्रवास सुरु झाला.

स्मिता पाटील यांनी स्त्रियांना केंद्र स्थानी ठेवून बनविण्यात आलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्या फक्त चित्रपटांमध्ये स्त्रीवादी भूमिका साकारत होत्या असे नाही. त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात एक फेमिनिस्ट होत्या. स्मिता पाटील मुंबईत महिलांसाठी काम देखील करत होत्या. स्मिता पाटील यांनी मिळालेली राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम देखील त्यांनी दान दिली होती. (Latest Entertainment News)

स्मिता पाटील यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागले. स्मिता पाटील राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या. राज बब्बर यांचे आधीच लग्न झाले होते. स्मिता पाटीलसाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला सोडले. राज बब्बर स्मिता पाटीलसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागले. राज बब्बरसोबत असलेल्या नात्यामुळे स्मिता पाटील यांना भरपूर टीका सहन करावी लागली. स्मिता पाटील यांना लोकांनी होम - ब्रेकर देखील म्हटले.

स्मिता पाटील यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये ८० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा प्रवास अजून सुंदर झाला असता. पण त्यांचे अकाली निधन झाले. स्मिता पाटील यांचा मुलगाला प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले. त्यामुळे १३ डिसेंमबर १९८६ साली अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे - विजय वडेट्टीवार

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT