सहा वर्षांची मराठमोळी सोशल मीडिया स्टार  संजय जाधव
मनोरंजन बातम्या

सहा वर्षांची मराठमोळी सोशल मीडिया स्टार

शेगावच्या कादंबरी ढमाळ या सहा वर्षीय चिमुकलीची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगलीय. या चिमुकलीचे महापुरुषांचे इतिहास उलगडणारे व्हिडीओ चांगलेच गाजत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा : शेगावच्या कादंबरी ढमाळ या सहा वर्षीय चिमुकलीची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगलीय. या चिमुकलीचे महापुरुषांचे इतिहास उलगडणारे व्हिडीओ चांगलेच गाजत आहेत. सोबतच कादंबरीचे जोक्स, डान्स, लावण्यांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. कादंबरीच्या व्हिडीओला इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

हे देखील पहा -

लहान मुलांचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. प्रत्येकाला मुलांचा खोडकरपणा, त्यांचे लाडात बोलणे आवडते. कदाचितयाच कारणामुळे लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील अश्याच एका छोट्या मुलीचे भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील कादंबरी के.जी.२ मध्ये शिकत आहे. तिचे वय अवघे सहा वर्षे आहे. इंस्टाग्रामवर प्रचंड वायरल होणारा श्रद्धा शिंदे यांचा व्हिडीओ 'मला म्हणत्यात हो पुण्याची मैना' या गाण्यावरचा तुफान व्हायरल झालेला व्हिडीओ कादंबरीने पाहिला आणि तिला तो प्रचंड आवडला. अश्याच प्रकाराचे वेगवेगळे व्हिडीओ तिने पाहायला सुरुवात केली.

कादंबरीने तिच्या वडिलांकडे श्रद्द्दा शिंदे सारखे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट केला. मग काय चिमुकलीच्या हट्टापुढे बापाने देखील होकार देऊन तिला हे रिल्स आणि व्हिडीओ बनवायला मदत केली. तेव्हापासून कादंबरी असे छोटे छोटे व्हिडीओ बनवत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडीओमुळे ती घरा-घरात पोहचली.

विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तीचे कौतूक होत आहे. नुकताच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडीओ चांगलाच गाजलाय. सध्याच्या काळात लहान मुलांना टीव्ही, मोबाईलचे व्यसन जडले असताना, या चिमुकलीला महापुरूषांच्या विचारांवर आधारित अभिनय करावासा वाटणे, हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल. कादंबरीला महापुरुषांच्या शौर्याचे वर्णन सोबतच लावण्या, डान्स करायला आवडतो सोबतच तिला भरपूर जोक्स देखील तोंडपाठ आहेत.

कादंबरी ढमाळचा परिवार पुरोगामी विचारांचा असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कांदबरीवर महापुरुषांच्या विचारांचे संस्कार केले आहेत. घरून प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्या अभिनय कौशल्यातुन कादंबरी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या घरच्यांना वाटतोय. शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही तीला देण्यात येत आहेत.कादंबरीच्या या अफलातून अभिनयाचे मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी व्यक्तिशः कौतुक देखील केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika-Vijay : लगीन घटिका समीप आली! रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या शाही विवाह सोहळ्याचा मंडप सजला, पाहा झलक|VIDEO

Stray Dog Attack : घराबाहेर खेळताना कुत्र्यांचा हल्ला, १२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

Ladki Bahin Yojana: फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार जानेवारीचा हप्ता; तुमचंही नाव आहे का?

मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

SCROLL FOR NEXT