Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par : 'सितारे जमीन पर'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; आमिर खान नव्या भूमिकेत, पाहा VIDEO

Sitaare Zameen Par Trailer : आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan ) बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia ) देखील झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे.

'सितारे जमीन पर'च्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेम, हास्य आणि भावनिक क्षण यांचा परिपूर्ण ताळमेळ साधण्यात आला आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाची टॅगलाईन आहे की, "सबका अपना अपना नॉर्मल" जो सर्वांना स्वीकारण्याचा आणि समावेशकतेचा संदेश देते. ट्रेलरमध्ये आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे.

'सितारे जमीन पर'च्या ट्रेलरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "1 टिंगू बास्केटबॉल प्रशिक्षक, 10 तुफानी सितारा आणि त्यांचा प्रवास..." हा चित्रपट कुटुंबासोबत विशेषता आपल्या मुलांसोबत थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे. चित्रपटात आमिर खान एका वेगळ्या अंदाजत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे बोले जात आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर आणि जिनिलियासोबत इतर अनेक नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. आमिर आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT