Hardeek Joshi : मराठमोळ्या अभिनेत्याची हिंदी चित्रपटात वर्णी; पहिल्या लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Hardeek Joshi Hindi Movie : मराठमोळा अभिनेता हार्दिक जोशी लवकरच हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
Hardeek Joshi Hindi Movie
Hardeek JoshiSAAM TV
Published On

आज मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar)चा वाढदिवस आहे. अक्षया देवधरला 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तसेच या मालिकेमुळे तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळाला. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमधील हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर ही चाहत्यांचा आवडती जोडी आहे. आज अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने तिला स्पेशल गिफ्ट दिले आहे.

हार्दिक जोशीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. यात त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाचा धमाकेदार टीझर पाहायला मिळत आहे. या टीझरनेप्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हार्दिक जोशीच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव 'गुरु-जी' असे आहे. टीझरमध्ये हार्दिक ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. तो समुद्रकिनारी हातात हत्यार घेऊन मारामारी करताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्याला फडका बांधलेला आहे. चित्रपटातील हार्दिकचा जबरदस्त लूक पाहून चाहते भारावले आहेत.

हार्दिक जोशीने चित्रपटाच्या टीझरच्या पोस्टला खूपच खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "प्रत्येक नायकाच्या आयुष्यात त्याला दिशा दाखवणारी एक स्त्री असते.मी माझा पहिल्या हिंदी चित्रपटाचा टीझर अक्षया देवधरच्या वाढदिवशी रिलीज करत आहे. अक्षया हे गिफ्ट तुझ्यासाठी..." सध्या टीझरवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते आता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा-पाठकबाईंची जोडी घराघरात पोहचली. ही जोडी आताही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Hardeek Joshi Hindi Movie
Pawandeep Rajan : हाताला फ्रॅक्चर अन् पायला दुखापत, रुग्णालयात पवनदीप राजननं गायलं गाणं, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com