Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Collection: 'सितारे जमीन पर'ची 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री; अक्षय कुमार आणि सनी देओलच्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 9: आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे.

Shruti Vilas Kadam

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 9: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २१ जून रोजी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आमिर व्यतिरिक्त, या चित्रपटातील इतर तरुण कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत, आता दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांच्या या चित्रपटाचा शनिवारचा कलेक्शन समोर आला आहे.

शनिवारी 'सितारे जमीन पर'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'सितारे जमीन पर'ची कथा विनोदी सोबतच भावनिकही आहे. ती तुम्हाला हसवेल आणि रडवेलही. हा एक संपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. आतापर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज कोट्यवधींची कमाई करत होता.

'सितारे जमीन पर' कलेक्शन

दिवस १- १०.७ कोटी

दिवस २- २०.२ कोटी

दिवस ३- २७.२५ कोटी

दिवस ४- ८.५ कोटी

दिवस ५- ८.५ कोटी

दिवस ६- ७.२५ कोटी

दिवस ७- ६.५ कोटी

दिवस ८- ६.७५ कोटी

दिवस ९- १२.७५ कोटी

एकूण कलेक्शन - १०८.३० कोटी

बॉक्स ऑफिसवर 'सितारे जमीन पर'ची स्पर्धा काजोलच्या 'मां' आणि 'कन्नप्पा' या चित्रपटाशी आहे. हे दोन्ही चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. 'सितारे जमीन पर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी त्याने १०.७ कोटींची कमाई केली. 'सितारे जमीन पर'ने ९ व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १२.७५ कोटींची कमाई केली आहे. आता त्याचे एकूण कलेक्शन १०८.३० कोटी झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT