Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 13 : सध्या बॉलिवूडचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' यांचे तेराव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection Day 13 ) सिंघम आणि रूह बाबाचा धमाका पाहायला मिळत आहे. 'सिंघम अगेन' (Singham Again) आणि 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3 ) एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आले. पहिल्या दिवसापासून यांच्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा ॲक्शन चित्रपट आहे. तर 'भूल भुलैया 3' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या तेराव्या दिवशी म्हणजे बुधवारी अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने 3.15 कोटी रुपये कमावले. त्यामुळे या चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन 217.65 कोटी रुपये झाले आहे. तर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'ने बुधवारी 3.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'भूल भुलैया 3'चं वर्ल्डवाइड कलेक्‍शन 321.75 कोटी रुपये झाले आहे. तर 'सिंघम अगेन'चं वर्ल्डवाइड कलेक्‍शन जवळपास 323 कोटींची कमावले आहे.

तगडी स्टारकास्ट

'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणसोबत रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ हे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित हे कलाकार पाहायला मिळत आहे. यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT