Singham Again canva
मनोरंजन बातम्या

Singham Again: कॉप यूनिवर्समध्ये 'रामायण'चा ट्विस्ट, धमाका करायला येतेय अजयची सेना, पाहा ट्रेलर

Saam Tv

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा चित्रपट म्हटलं की चित्रपटगृहांमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायलाच मिळतो. सध्या रोहित यांच्या 'सिंघम आगेन' या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. रोहित शेट्टींच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम आगेन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉंच होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची पहिली झलक निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली होती.

सोशल मीडियावर 'सिंघम आगेन' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून भरभरुन पसंती मिळताना दिसत आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहात होते.

'सिंघम आगेन' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, बाजीराव सिंघमच्या घरातील मुलगा मोठा झाला आहे. त्यासोबतच या चित्रपटामध्ये करीना कपूरने सिंघमच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये करीना कपूरचं अपहरण करण्यात आले आहे आणि त्यानंतर सिघम असा दावा करतो की माझ्या मुलाच्या मनामध्ये त्यांच्या आईबद्दल प्रेम आणि राग या दोन्ही भावना आहेत परंतु तो जिच्यावर प्रेम करतो तिच्यासाठी तो काहीही करु शकतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहुन असे वाटत आहे की रोहित शेट्टीची पोलिस फोर्स हा मिशन पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे.

'सिंघम आगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ हे सगे कलाकतार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. आतापर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'सिंघम अगेन' दिवाळीला प्रदर्शित होणार असल्याचे माहिती दिली आहे. आजय देवगणचा हा चित्रपट १ नव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मोठी बातमी! सहकारी संस्था निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Black Rose: काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?

VIDEO : रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे; पाहा काय आहे प्रकरण

National Animal: भारताचा वाघ, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पाहून हसायलाच येईल

SCROLL FOR NEXT