Kannad Result : पत्निकडून पतीचा पराभव, कन्नड मतदार संघात संजना जाधव विजयी

maharashtra vidhan sabha election results 2019 : रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव विरूद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढत ही दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. काही दिवसांआधी संजना जाधव यांनी प्रचारादरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप करीत ढसाढसा रडल्या होत्या.
Sanjana Jadhav: भरसभेत रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधव ढसाढसा रडल्या, पाहा VIDEO
Sanjana Jadhav Saam Tv
Published On

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लागलेला निकाल हा अनेकांसाठी आश्चर्यचकीत करणारा आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला मिळालेले यश हे अभूतपूर्व मानल्या जात आहे. कन्नड मतदार संघात कन्नड पुर्वाश्रमीची पत्नी विरूद्ध पती अशी लढत होती. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव विरूद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढत ही दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. काही दिवसांआधी संजना जाधव यांनी प्रचारादरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप करीत ढसाढसा रडल्या होत्या. हे भाषण संजना जाधव यामच्या यशासाठी कारणीभूत ठरल्याचे मानल्या जात आहे. 

तिहेरी लढतीत संजना जाधव यांच्या पदरात यश

संजना जाधव यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार उभे होते. या मतदार संघात उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे गटाकडून उभे होते. महत्त्वाचे म्हणजे ते या मतदार संघातले प्रबळ दावेदार मानल्या जात होते. येथे मुख्य लढत एकनाथ शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या गटात होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजना जाधव निवडणूक रिंगणात, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत हे रिंगणात होते. 17 व्या फेरीमध्ये संजना जाधव या एकूण 54,464 मतांनी आघाडीवर होत्या.  16 व्या फेरीत 29,141 मते उदयसिंह राजपूत यांना मिळाली. संजना जाधव या सुरवातीपासूनच आघाडीवर होत्या. रावसाहेब दानवे यांंची लेक संजना जाधव या विजयी झाल्या आहेत.   

कन्नड विधानसभा मतदारसंघ हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील मतदार संघ आहे. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव हे देखील आमदार होते. अभ्यासू व्यक्तिमत्व  म्हणूण त्यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ओळले जाते. पाणी प्रश्नासाठी त्यांनी केलेले काम हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव हे देखील मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला होता.

हर्षवर्धन जाधव यांचा विवाह भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्याशी झाला होता. मात्र हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यात खटके उडले. हर्षवर्धन जाधव यांनी त्यासाठी सासरे रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरले. संजना जाधव यांनी निवडणूकीत नशीब आजमावयाचे ठरविल्यानंतर रावसाहेब दानवेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संजना जाधव यांचा शिवसेनेत रितसर प्रवेश केला आणि कन्नड मतदार संघातून उमेदवारी दिली. इतर मतदार संघांच्या तुलनेत या मतदारसंघातील निकालाची अधिक चर्चा होत आहे. 

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com