MP Sanjay Raut PC : शपथविधीसाठी गुजरातला जावे; संजय राऊतांचा टोला
राज्यात मुख्यमंत्री कोण होणार गुजरात लॉबी ठरवणार आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये शपथविधी केला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला मोदींच्या नावाच्या स्टेडियममध्ये सोहळा घ्यावा. मुंबई शिवतीर्थावर घेतला, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल. वानखेडे स्टेडियममध्ये घेतला तर समोरच्या 106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आता कुणी, कुठेही, कशाही उड्या मारू शकेल. विकत घेऊ शकेल. कारण कायद्याची दहाव्या शेड्युल्डची भीती राहिली नाही. कारण धनंजय चंद्रचूड यांनी ती भिती घालवून पक्षांतरासाठी दारे उघडे ठेवून गेले आहेत, असेही संजय राऊत कालचा निकाल आधीच ठरवला होता. फक्त मतदान होऊ दिले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. हे सरकार गुजरात लॉबीला हवे होते, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी गुजरातला जावे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.