हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. 'सिंघम अगेन' (Singham Again) रिलीज होऊन आता तीन दिवस पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट 1 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
'सिंघम अगेन' हा २०२४ च्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'सिंघम' चा हा तिसरा भाग आहे. 'सिंघम' हा चित्रपट 2011 मध्ये तर 'सिंघम रिटर्न्स' हा 2014 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.
'सिंघम अगेन' आता थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असून आता हा चित्रपट लवकरच तुम्ही घरबसल्या देखील पाहून शकणार आहात. 'सिंघम अगेन' आता ओटीटीवर (OTT Release) पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ॲक्शन आणि ड्रामाने भरपूर 'सिंघम अगेन'चे स्ट्रीमिंग हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने विकत घेतले आहेत. आता चाहते घरबसल्या ॲक्शनचा धमाका पाहू शकतात. 'सिंघम अगेन' डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 'सिंघम अगेन' ओटीटीवर रिलीज होणार आहे. मात्र याची अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.
'सिंघम अगेन'ने पहिल्या दिवशी 43.50 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 42.50 कोटी रुपये कमावले आहे. आता 'सिंघम अगेन'ने तिसऱ्या दिवशी 35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत एकूण 121 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये अनेक बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार हे कलाकार पाहायला मिळत आहे. तसेच अजुर्न कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहे.'सिंघम अगेन'मध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा कॅमिओ देखील आहे. दमदार ॲक्शनने भरपूर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.