Gulabi Saree Spotted At Times Square Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gulabi Saree Spotted At Times Square: मराठमोळ्या संजू राठोडची ‘गुलाबी साडी’ ग्लोबल झाली, ट्रेंडिंग गाणं टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकलं...

Sanju Rathore Gulabi Saree Song: संजु राठोडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवर त्याच्या गाण्याची झलक दिसलेली आहे.

Chetan Bodke

Gulabi Saree Spotted At Times Square

सध्या सोशल मीडियावर संजु राठोडच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्याची भुरळ अगदी लहानांपासून थोऱ्या मोठ्यापर्यंत तर सामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना पडलेली आहे. हे गाणं आता फक्त राज्यात किंवा देशातच फेमस झालेलं नाही तर जगभरात हे गाणं फेमस झालेलं आहे. अशातच संजु राठोडच्या शिरपेचात नुकताच एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवर त्याच्या गाण्याची झलक दिसलेली आहे. (Song)

संजु राठोडचे ‘गुलाबी साडी’हे गाणं फेब्रुवारी २०२४ मध्ये सोशल मीडियावर रिलीज झालेलं आहे. हे गाणं क्षणातच प्रत्येकाच्या मोबाईलवर तुफान व्हायरल झालं. गाण्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून या गाण्याला ६५ कोटी ९० लाख ५ हजार ७१८ इतके व्ह्यूज सध्या सोशल मीडियावर मिळालेले आहेत. हे गाणं सध्या युट्यूबवर ग्लोबल टॉप म्युझिक व्हिडीओंमध्ये टॉप ३ वर आहे. नुकतंच हे गाणं न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरवर रिलीज झाले आहे. टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवर रिलीज झालेल्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच संजु राठोडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. (Social Media)

संजू राठोडने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "लोकल चार्म ते ग्लोबल फेम, गुलाबी साडी न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकली" तर पुढे #GulabiSadi #SanjuRathod #BelieveArtistServices असे हॅशटॅग वापरत त्याने तो व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडीओमध्ये, ज्यांनी ज्यांनी ‘गुलाबी साडी’ गाण्यावर रिल केलेली आहे, त्यातील काही भागांचा व्हिडीओ वापरून काही सेकंदाचा व्हिडीओ बनवला आहे. सध्या संजू राठोडचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या ह्या गाण्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (Viral Video)

संजू राठोडने गायलेले ‘गुलाबी साडी’ हे गाणं फेब्रुवारी २०२४ ला रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत संजू राठोड आणि प्राजक्ता हे दोघेही आहेत. या संजू राठोडने या गाण्याला आवाज दिला असून संजू राठोडने स्वत: हे गाणं लिहिलं आहे. सध्या हे गाणं इन्स्टाग्रामवर कमालीचं चर्चेत आलं असून अनेकजणं गाण्यावर रिल्स बनवत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

SCROLL FOR NEXT