salim merchant Saam tv
मनोरंजन बातम्या

Pahalgam terror attack : मुस्लीम असल्याची लाज वाटतेय; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावर गायक मनातलं बोलून गेला

Singer Salim Merchant on Terror Attack: मुस्लीम असल्याची लाज वाटत असल्याची म्हणत प्रसिद्ध गायक सलीम मर्चेंट यांनी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी बोलताना गायक मनातलं बोलून गेला.

Vishal Gangurde

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. दहशतवाद्यांनी एकूण २८ जणांची हत्या केली. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अनेक सेलिब्रिटींनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. गायक सलीम मर्चेंटनेही पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केला. मला मुस्लीम असल्याची लाज वाटत असल्याचे म्हणत सलीम मर्चेंटने हल्ल्याचा निषेध केलाय.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सलीम मर्चेंटने बुधवारी रात्री इन्स्टाग्राम हँडलवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सलीम मर्चेंटने म्हटलं आहे की, 'पहलगाममध्ये निर्दोष लोकांची हत्या करण्यात आली. हिंदू असल्याने त्यांची हत्या झाली. निष्पापांची हत्या करणारे मुस्लीम होते? नाही. ते दहशतवादी होते. इस्लाम या गोष्टी शिकवत नाही. कुरान-ए-शरीफ, सूरह अल-बकरा, आयत २५६ मध्ये म्हटलं आहे की, 'धर्माच्या बाबतीत कोणतीही सक्ती नाही. ही बाब कुरान-ए-शरीफ मध्ये लिहिली आहे'.

सलीमने पुढे म्हटले आहे की, 'मला मुस्लीम असल्याची लाज वाटत आहे. माझ्या निर्दोष हिंदू भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. हिंदू असल्याने त्यांची हत्या झालीये. हे सर्व कधी संपणार? काश्मिरी लोक गेल्या २-३ वर्षांपासून सुखात जगत होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. मला समजत नाहीये की, आता दु:ख व्यक्त करू की राग व्यक्त करू. निष्पाप पर्यटकांनी प्राण गमावलेल्या लोकांसाठी प्रार्थना करतो. देव मृतांच्या कुटुंबीयांना बळ देवो. ओम शांती'.

अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केलं दु:ख

सलीम मर्चेंट यांच्या व्यतिरिक्त बॉलिवूडचे अनेक स्टार्सने राग व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान यांच्या सहित अनेकांनी सोशल मीडियावर हल्ल्याचा निषेध केला. काहींनी हे कृत्य अमानवीय म्हटलं तर काहींनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची विनंती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT