Sachin Sanghvi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sachin Sanghvi : प्रसिद्ध गायक सचिन सांघवीविरुद्ध गुन्हा दाखल; अत्याचार अन् गर्भपाताचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Sachin Sanghvi Arrested : प्रसिद्ध गायक सचिन संघवी याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध गायक सचिन सांघवीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन सांघवी यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी केली आहेत.

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक, संगीतकार सचिन संघवी (Sachin Sanghvi) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. सचिन संघवी याच्यावर एका तरुणीने लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. सचिन संघवी याच्या विरुद्ध विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला अटकदेखील करण्यात आली होती. मात्र त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सचिन संघवी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 74 आणि 89 अंतर्गत फसवणूक, अत्याचार आणि संमतीशिवाय गर्भपात केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. महिलेने केलेल्या आरोपानंतर सचिन संघवीला 22 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. FIRमधील माहितीनुसार, सचिन संघवी विरुद्ध तक्रार विलेपार्ले पूर्व येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणी गायिकेने केली आहे. पीडित महिलेची 2024 फेब्रुवारीमध्ये सचिन संघवीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. सचिनने तिच्या गाण्याचे, आवाजाचे कौतुक केले. तिला अल्बममध्ये काम करण्याची ऑफर दिली.

कामामुळे एकमेकांचे नंबर घेतले आणि दोघे बोलू लागले. सांताक्रूझ येथील स्टुडिओमध्ये दोघे कामानिमित्त कायम भेटायचे. सचिनने पत्नीला घटस्फोट देऊन पीडितेशी लग्न करण्याचं आश्वासन दिले होते. त्यानंतर एप्रिल 2024मध्ये सचिनने पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. हे दोघे बुडापेस्ट येथे फिरायला गेले होते. काही काळानंतर महिलेला सचिन संघवी आपल्याला फसवत असल्याचे समजले.

2025 ला पीडित महिलेने सचिन संघवीच्या फोनमध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो आणि चॅट्स पाहिले. ज्यामुळे त्यांच्यात वाद झाला. जेव्हा दोघे कामानिमित्त दुबईला गेले तेव्हा महिलेच्या इच्छेविरुद्ध सचिनने तिच्यासोबत संबंध ठेवले. त्यानंतर ती महिला गरोदर राहिली. हे जेव्हा सचिनला समजले तेव्हा त्याने महिलेवर गर्भपातासाठी दबाव टाकला. पीडित महिलेला धमकी दिली की, तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर लीक करेन. भीतीमुळे पीडितेने गर्भपात केला आणि सचिन संघवीसोबतचे सर्व संबंध तोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : साताऱ्यानंतर हिंगोली हादरली, महिलेवर बलात्कार; पोलिसांची चूक वाचून संतप्त व्हाल

Maharashtra Live News Update: अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

Sanjay Shirsat: ४ वेळा आमदार राहिलो आता बस झालंं; महायुतीच्या मंत्र्याकडून निवृत्तीचे संकेत|VIDEO

Maharashtra Weather: अवकाळीचा तडाखा! मुंबईसह राज्यात पावसाचे तांडव, पुढील चार दिवस महत्त्वाचे, वाचा IMD चा अंदाज

Dnyanda Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी, दिसते चंद्राची कोर साजरी

SCROLL FOR NEXT