सुप्रसिद्ध गायिका रिहाना आई झाली आहे.
रिहानाने गोंडस मुलीली जन्म दिला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करून रिहानाने बाळाची पहिली झलक दाखवली आहे.
मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध गायिका रिहाना आई झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तिने आपल्या गाण्याने जगाला भुरळ घातली आहे. रिहाना (Rihanna ) तिसऱ्यांदा आई झाली आहे. रिहानाला 'पॉप क्वीन' म्हणून ओळखले जाते. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना बाळाचा पहिली झलक दाखवली आहे.
रिहानाच्या जोडीदाराचे नाव रॅपर रॉकी असे आहे. रिहाना आणि रॉकी आई-बाबा झाले आहेत. रिहानाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रिहानाने आपल्या मुलीचे नाव 'रॉकी आयरीश मेयर्स' (Rocki Irish Mayers) असे ठेवले आहे. रिहानाने 13 सप्टेंबर 2025ला लेकीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर रिहानाने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत रिहाना आणि तिची मुलगी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तर दुसरा गुलाबी शूजचा फोटो शेअर केला आहे.
रिहाना मोठी दोन मुलं आहेत. ज्यांची नावे रिझा (RZA) आणि रायट (Riot) असे आहे. 2025मध्ये मेट गालामध्ये रिहानाने बेबी बंप फ्लॉन्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. रिहानावर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आपल्या गाण्याने चारचाँद लावले. तिने आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती खास अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नासाठी गुजरातच्या जामनगरमध्ये आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, रिहानाने तब्बल 66 कोटी ते 74 कोटी दरम्यान लग्नात परफॉर्मन्ससाठी मानधन घेतले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.