Singer Kailash Kher Got Angry Twitter
मनोरंजन बातम्या

Kailash Kher At Khelo India Event: ‘तुम्ही काय हुशारी दाखवता...’ भर कार्यक्रमात कैलाश खेर आयोजकांवर संतापले Video Viral

Chetan Bodke

Singer Kailash Kher Got Angry: संगीत क्षेत्रातील एक अजरामर आणि लोकप्रिय नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर. आपल्या गाण्याची खासियत फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर अख्ख्या जगात कैलाश खेरचे चाहते आहेत. कैलाशचा आवाज प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करून आहे. नेहमीच संगीतप्रेमींना आवडणाऱ्या कैलाश खेरला नुकतंच लखनौ येथील ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023’ मध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023’ आयोजन लखनऊ, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले होते. हा कार्यक्रम २५ मे ते ३ जून या कालावधीत होणार आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला कैलाश खेर यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कैलाश खेरला या कार्यक्रमाबाबत वाईट अनुभव आल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर ताशेरे ओढले. त्याचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कैलाश खेर कार्यक्रमात म्हणतो, “तुम्ही हुशारी दाखवता, जरा सभ्यता शिका, मला एक तास थांबवलं, हे खेलो इंडिया आहे का? असं काम होतं तर आलोच नसतो. खेलो इंडिया तेव्हाच आहे जेव्हा आपण आनंदी असतो, जेव्हा जेव्हा घरातील सदस्य सुखी असतील तरच बाहेरचे लोकही आनंदी असतील. भडकलेल्या कैलाश खेर यांना पाहून तेथील सगळेच थक्क झाले.”

तर पुढे गायक कैलाश खेर म्हणतात, “जर तुम्ही मला परफॉर्मन्ससाठी बोलावलं असेल, तर पुढचा एक तास पूर्णपणे माझा आहे. मी माझी मातृभूमी भारत आणि तेथील नागरिकांची पूजा करतो. पण व्यवस्थापन योग्य असलं पाहिजे, अन्यथा कार्यक्रम विस्कळीत होत जाईल.” कैलाश खेर यांनी आपला राग बाजूला सारला आणि नंतर कार्यक्रमाच्या मंचावर पोहोचले. त्यांनी अनेक गाणी गायली.

कैलाश खेर ट्रॅफिक जाममुळे कार्यक्रमाला सुमारे एक तास उशिरा पोहोचले. कार्यक्रमात व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यानं कैलाश खेर कमालीचा चिडला होता. यादरम्यान कैलाशला इतका राग आला की, त्याने लखनऊच्या नागरिकांना अनेक कानमंत्र देखील दिले.

‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023’ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्पोर्ट्स इव्हेंट मानला जात आहे. हा कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील बीबीडी विद्यापीठात आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम गुरुवारी, २५ मे रोजी सुरू झाला असून ३ जून रोजी बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) वाराणसी येथे समारोप होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT