Himesh Reshammiya Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Himesh Reshammiya Birthday : वडिलांच्या अपुऱ्या इच्छेमुळे हिमेश रेशमियाने बदलला निर्णय, व्हायचं होतं अभिनेता पण...

Himesh Reshammiya Career : गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाँ हे नाव भारतात संगीत क्षेत्रात एकेकाळी प्रसिद्ध झालेलं नाव आहे. या बहुआयामी गायकाचा आज ५१ वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाँ हे नाव भारतात संगीत क्षेत्रात एकेकाळी प्रसिद्ध झालेलं नाव आहे. एकेकाळी त्याचीच गाणी प्रत्येक चित्रपटात गाजत होती. तेव्हाही आणि आजही हिमेशला रिॲलिटी शोजमध्ये आवर्जून आमंत्रित केलं जातं. अशाच या बहुआयामी गायकाचा आज ५१ वा वाढदिवस आहे.

त्याच्या स्टाईलचे आजही लाखो फॅन्स आहेत. आणि त्याच खास स्टाईलने हिमेशला सर्वात मोठी प्रसिद्धी दिली. हिमेश रेशमियाँचा जन्म २३ जुलै १९७३ रोजी गुजरातमधील भावनगरमध्ये झाला. हिमेशचे वडीलसुद्धा संगीतकार होते. वडील संगीतकार असल्यामुळे त्याला बालपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले होते. त्याला संगीत क्षेत्रात करियर करायचे नव्हते, पण त्याला एक दमदार अभिनेता व्हायचं होतं.

वडिलांच्या इच्छेखातर हिमेश गायक झाला. खरंतर हिमेशला अभिनयात करियर करण्याची इच्छा होती. पण त्याने आपल्या वडिलांच्या इच्छेपायी हा मोठा निर्णय घेतला. खरंतर, हिमेशला एक मोठा भाऊही होता. त्यांचं वयाच्या ११ व्या वर्षी निधन झालं होतं.

आपल्या प्रमाणेच आपल्या मुलांनीही संगीत क्षेत्रामध्ये करियर करावे, अशी इच्छा त्यांच्या वडिलांची होती आणि ती इच्छा पूर्ण केली हिमेशने. त्यासोबतच चित्रपट बनावयची हिमेशच्या वडीलांची एक इच्छा होती.

त्यांना एक चित्रपट बनवायचा होता. त्यात मुख्य भूमिकेत सलमान खानला घ्यायचं होतं आणि त्या चित्रपटातून हिमेशला लाँच करायचं होतं. पण तसं काही झालं नाही.

मात्र, सलमानने जेव्हा हिमेशचं काम पाहिलं, तेव्हा तो प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या चित्रपटासाठी ऑफर केले. हिमेशने १९९८ मध्ये सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केलं.

तेव्हापासून अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि हिमेशने एकत्र कामही केले आहे. ते दोघं बेस्ट फ्रेंड्स म्हणून सर्वत्र फेमसही आहेत.सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी हिमेशने संगीत दिलं असून त्याची गाणी तुफान हिट झाली आहेत.

सलमानच्या ‘दुल्हन हम ले जाएंगे’ या चित्रपटातून हिमेशने सोलो डेब्यु केलं आणि याच चित्रपटाने हिमेशला खरी ओळख मिळाली. 'कहीं प्यार ना हो जाए', 'तेरे नाम', 'ये है जलवा', 'दिल ने जिसे अपना कहा', 'क्योंकी, मैंने प्यार क्यों किया', 'बॉडीगार्ड', 'किक', 'प्रेम रतन धन पायो', 'राधे' आणि 'किसी का भाई किसी की जान' यांसारख्या सलमानच्या चित्रपटांना हिमेशनेच सुपरहिट गाणी दिली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT