gippy grewal threatened by goldy brar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Threat Call: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी; फोनवरून दिला सावध राहण्याचा इशारा

Famous Singer Threat Call: बादशाहाला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला गुंड गोल्डी ब्रारकडून फोन आला आहे. या कॉलमध्ये त्याला गंभीर परिणाम होतील अशी धमकी देण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Singer Threat Case: बॉलीवूडमध्ये हल्ली भितीचे वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींना धमक्या मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी बादशाहाला देखील डोक्यावर गोळी मारू अशी धक्कादायक भिती मिळाली होती. आता प्रसिद्ध पंजाबी अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालला गुंड गोल्डी ब्रारने धमकी दिल्याचा एकऑडिओ रेकॉर्डिंग मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ऑडिओमध्ये, फोन करणारा ब्रारला असे म्हणताना ऐकू येतो की, गायकाने त्याच्या आधीच्या त्याचे मॅसेज दुर्लक्ष केले आता पुढचे मॅसेज दुर्लक्षित न करण्याचा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.हा ऑडिओ रेकॉर्डिंग शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी शेअर करुन कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून आम आदमी पार्टी (आप) सरकारवर टीका केली.

या गुंडाने यापूर्वीही धमक्या दिल्या आहेत

गुंड गोल्डी ब्रारने पंजाबी चित्रपट कलाकारांना धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. त्याने यापूर्वी सलमान खानसह अनेक चित्रपट कलाकारांना धमकी दिली होती,आता, गोल्डीने गिप्पी ग्रेवाललाही धमकी दिली आहे. यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे. विशेष म्हणजे २०२२ रोजी झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचाही गोल्डी ब्रारवर आरोप आहे.

चित्रपटसृष्टीत गुंडांची दहशत पसरली आहे

बॉलीवूडसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीने असा एक काळ अनुभवला होता, जेव्हा गुन्हेगारांचे चित्रपटसृष्टीवर वर्चस्व होते. गुंड दिवसाढवळ्या चित्रपटसृष्टीवर राज्य करत होते. एवढेच नाही, तर टी-सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या एका गुंडाने हत्या केली होती. पण, गेल्या काही वर्षांत हे कमी झाले होते.

मात्र, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या आल्यापासून पुन्हा गुंडांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. अलीकडेच, शुभम लोंकर नावाच्या गुंडाने रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेशही दिले होते. गोल्डी आणि लॉरेन्स एकेकाळी एकाच टोळीत होते, पण नंतर ते वेगळे झाले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचाही गोल्डी ब्रारवर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी बादशाहाला देखली जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता तो गिप्पी ग्रेवाललाही धमक्या देत आहे. गिप्पी हा पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक चमकता तारा असून तो आपल्या अभिनयाने आणि गायनाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT