HBD Diljit Dosanjh SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Diljit Dosanjh : एकेकाळी चार पैशांसाठी गायचा किर्तन अन् आता होतात जगभरात कॉन्सर्ट, 'पंजाबी मुंडा' दिलजीत दोसांझ किती कोटींचा मालक?

Diljit Dosanjh Net Worth : जगाला आपल्या सुरेल आवाजाने वेड लावणारा गायक दिलजीत दोसांझचा आज ४१वा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आजवर अनेक चढउतार पाहिले असून तो आता एक यशस्वी गायक आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आज 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्यांने आजवर अनेक हिट गाणी गायली आहेत. तो कायमच आपल्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालतो. त्यांनी जगभरात गाण्याचे लाइव्ह कॉन्सर्ट केले आहेत. जगात कानाकोपऱ्यात त्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

दिलजीत दोसांझ एका एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आणि स्टार झाला आहे. लहानपणी त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दिलजीत किर्तन गायचा आणि आता तोच मुलगा संपूर्ण जगाला आपल्या स्टाइल आणि गाण्याने वेड लावत आहे. दिलजीतचे शिक्षण पंजाबमध्ये झाले आहे. दिलजीत शास्त्रीय गायन देखील शिकला आहे.

दिलजीत दोसांझ गाण्याचा प्रवास

जगाला आपल्या गाण्याच्या तलावर नाचवणारा गायक दिलजीत दोसांझ कोटींचा मालक आहे. त्याने खूप कष्टाने ही संपत्ती उभारली आहे. 'इश्क दा उडा अड्डा' हा दिलजीतचा पहिला अल्बम 2004 ला रिलीज झाला. या अल्बममुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. मात्र दिलजीतला इंडस्ट्रीत खरी ओळख 'गोलियां' या रॅपर हनी सिंहसोबतच्या गाण्यामुळे मिळाली. हे गाणे 2009 ला प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर त्यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत.

गायकासोबतच दिलजीत एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाने त्यांने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचा 'गुड न्यूज' हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने त्याला अभिनय क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळवून दिली.

दिलजीत दोसांझ नेटवर्थ

दिलजीतकडे आलिशान घर आणि लग्जरी कार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझची एकूण संपत्ती 172 कोटी रुपये आहे. दिलजीत अभिनय, गाण्यासोबतच ब्रँडमधून देखील पैसा कमावतो. तसेच तो अनेक व्यवसायात गुंतवणूक करतो. दिलजीतचे मुंबईत घर आहे. कोटींच्या घरातील मर्सिडीज कार त्याच्याकडे आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझ एका कॉन्सर्टसाठी 4 कोटी रुपयांचे मानधन घेतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT