Amaal Mallik deleted Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amaal Mallik: अमाल मलिकने केली 'ती' पोस्ट डिलीट; म्हणाला, 'मी नेहमीच माझ्या कुटुंबावर प्रेम करेन पण...'

Amaal Mallik deleted Post: गायक आणि संगीतकार अमाल मलिकने डिप्रेशन आणि कौटुंबिक समस्यांमध्ये अडकला आहे. त्याने मनातील हळहळ व्यक्त करणारी सोशल मीडियावरील पोस्ट डिलिट केली आहे.

Shruti Vilas Kadam

Amaal Mallik deleted Post: गायक आणि संगीतकार अमाल मलिकने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली आहे ज्यात त्यांने डिप्रेशन आणि कुटुंबापासून दूर राहण्याच्या निर्णयाबद्दल उघडपणे सांगितले होते. संगीतकाराने आता एक नवीन पोस्ट शेअर केले आहे. यामध्ये त्याने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे आणि माध्यमांना या प्रकरणाचे वृत्तांकन करताना सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे.

त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये अमालने मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली परंतु माध्यमांना या पोस्टचा चुकीचा अर्थ काढू नटे असा सल्ला दिला आहे. त्याने लिहिले, "मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद; तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. परंतु मी मीडिया पोर्टल्सना विनंती करेन की त्यांनी माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नये. कृपया माझ्या असुरक्षिततेला बातमीच स्वरूप देऊ नये आणि नकारात्मक मथळे छापू नये.ही एक विनंती आहे. मला पुन्हा सारखं नॉर्मल होण्यासाठी खूप वेळ लागला आहे आणि हा माझ्यासाठी खूप कठीण काळ आहे. मी नेहमीच माझ्या कुटुंबावर प्रेम करेन पण सध्या मला दूर राहूदे, माझ्या आणि अरमानमध्ये काहीही बदल झाला नाही आहे. आम्ही दोघे भाऊ आजही एकत्र आहोत प्रेम आणि शांती."

पण अमालने डिलिट केलेल्या पोस्टमध्ये, अमलने क्लिनिकल डिप्रेशनशी सामना करण्याबद्दल बोलले आणि त्याचा भाऊ अरमान मलिकसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्याने सूचित केले की त्यांच्यातील वाढत्या भावनिक अंतराचे कारण त्यांचे पालक होते. त्यामुळे त्याने कुटुंबाशी असलेले संबंध केवळ व्यावसायिक बाबींपुरते मर्यादित ठेवण्याचा कठीण निर्णय घेतला.

अमाल म्हणाला, "आम्हा दोघांसाठीही हा प्रवास खूप छान होता, पण माझ्या आईवडिलांच्या कृतींमुळे आम्ही भाऊ म्हणून खूप दूर गेलो आहोत. या सर्व गोष्टींमुळे मी स्वतःसाठी पाऊल उचलले आहे, कारण त्यामुळे माझ्या मनावर खूप परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांनी माझे काम बिघडवण्याची आणि माझे नातेसंबंध, माझी मानसिकता आणि माझा आत्मविश्वास कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. खरोखर महत्त्वाचे म्हणजे या घटनांमुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. असे त्याच्या मागील पोस्टमध्ये लिहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT