Aanandi Joshi-Jasraj Joshi Instagram / @Aanandi Joshi
मनोरंजन बातम्या

Aanandi Joshi-Jasraj Joshi Wedding: सप्तसूर जुळले अन् पार पडल्या सप्तपदी; गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांनी उरकलं लग्न

Pooja Dange

Singer Aanandi Joshi-Jasraj Joshi Get Married :

सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांना लगीन घाई झाली आहे. काही दिवसांपूर्वी संकेत पाठक आणि सुवर्णा श्याम, आकाश पाटील, रश्मी पाटील, प्रतीक सुरेश या कलाकारांचा लग्नसोहळा पार पडला.

तर दुसरीकडे स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला असून 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधील पंचरत्नानांपैकी दोन रत्न म्हणजे प्रथमेश लघाटे नई मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. आता संगीत क्षेत्रातील आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकली आहे.

गायिका अनांदी जोशी आणि जसराज जोशी यम्मी गुपचूप लग्न केले आहे. ११ ऑगस्टला त्या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केले आहे. त्यांनी त्यांच्या लागाचें फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Latest Entertainment News)

आनंदीने हे फोटो शेअर करत लिहिले आहे, अतिशय आदराने तुमचे आशीर्वाद मागत आहोत, आम्ही आमच्या जीवनातील नवीन टप्प्याची सुरुवात करत आहोत.' त्यांच्या या पोस्टवर पंडित, इशा केसकर, श्रेया बुगडे, आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी जयवंत वाडकर, सलील कुलकर्णीसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आनंदी जोशी २००६-२००७ सालच्या 'सारेगमप' या रिऍलिटी म्युजिक शोची रनरअप ठरली होती. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये पार्श्वगायन केले आहे. तर जसराज जोशी हिंदी 'सारेगमप' २०१२चा विजेता ठरला होता. जसराने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच जसराजने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आनंदीने गायली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT