Rajinikanth-Coolie  yandex
मनोरंजन बातम्या

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

Coolie Movie Free Tickets : रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहण्यासाठी कंपनीने सुट्टी जाहीर केली असून चित्रपटाचे तिकीट देखील फ्री देण्यात आले आहे.

Shreya Maskar

रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

'कुली' पाहण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

तसेच 'कुली' चित्रपटाची तिकिट देखील फ्री दिली आहे.

सध्या सर्वत्र रजनीकांत (Rajinikanth) यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'कुली' (Coolie ) चित्रपट उद्या (14 ऑगस्ट)ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंगापूरमधील कंपनीने त्यांच्या तमिळ कर्मचाऱ्यांना रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोचे तिकीट देखील फ्री देत आहे.

14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'कुली' चित्रपटाने आगाऊ बुकिंगने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन होणार आहे. चाहते यासाठी खूप उत्सुक आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने चाहत्यांमध्ये इतका उत्साह निर्माण केला आहे की थिएटरबाहेरून सोशल मीडियापर्यंत फक्त 'कुली'ची चर्चा आहे.

कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटे

इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, मदुराईच्या युनो अ‍ॅक्वा केअर कंपनीने रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीने सोशल मीडियावर तशी एक नोटीस जारी केली आहे. ही सुट्टी चेन्नई, बंगळुरू, त्रिची, तिरुनेलवेली, चेंगलपट्टू, मट्टुथवानी आणि अरापलयमसह सर्व शाखांमध्ये लागू असेल.

तसेच या चांगल्या प्रसंगी कंपनीने अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये अन्न वाटप करण्याची, सामान्य लोकांना मिठाई वाटण्याची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कुलीची मोफत तिकिटे देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, सिंगापूरच्या एका कंपनीने चित्रपटाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या तमिळ कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.

तिकिट बुकिंगमध्ये रेकॉर्ड ब्रेक

मीडिया रिपोर्टनुसार, 'कुली' चित्रपटाने भारतात आगाऊ बुकिंगमधून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. परदेशात पहिल्या दिवसाचे बुकिंग 37 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. अशाप्रकारे, एकूण आगाऊ बुकिंग 100 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

Teachers Day 2025: शिक्षक दिन करा स्पेशल, तुमच्या शिक्षकांना अन् गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गतील विरंगुळ्याचे ठिकाण, जोडीदारासोबत घालवा निवांत संध्याकाळ

पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३,९७६ जणांना नोटिसा, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT