'सिकंदर' (Sikandar) चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. चित्रपटाने रिलीजआधीच तब्बल 165 कोटींची कमाई केली आहे. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी (Sikandar Box Office Collection Day 2) किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
सलमान खानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'सिकंदर' 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. तर 'सिकंदर'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी बंपर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 'सिकंदर'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 29 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे 'सिकंदर'ने दोन दिवसात तब्बल 55 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पाहायला मिळत आहे. या चित्रपटात यांच्यासोबत काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज 'सिकंदर' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे.
'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 29 कोटी कमावले. तर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 39.3 कोटींचा व्यवसाय केला होता. रविवार आणि ईदच्या सुट्टी असल्यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'सिकंदर' चित्रपटातील गाण्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. भविष्यात हा चित्रपट नक्कीच बंपर कमाई करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.