Balkaur Shingh Share New born Baby Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidhu Moose Wala: 'किंग इज बॅक' सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी दाखवली बाळाची पहिली झलक, VIDEO व्हायरल

Balkaur Shingh Share New born Baby Video: सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोतब शेअर केली. त्यानंतर आता त्यांनी हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत आपल्या मुलाची पहिली झलक दाखवली आहे.

Priya More

Sidhu Moosewala Mother Charan Kaur:

दिवंगत पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धु मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. सिद्धू मूसेवालाची आई चरण कौरने बाळाला जन्म दिला. घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोतब शेअर केली. त्यानंतर आता त्यांनी हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत आपल्या मुलाची पहिली झलक दाखवली आहे.

बलकौर सिंह यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'बलकौर सिंग आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला चमच्याने दूध पाजताना दिसत आहेत. त्याचसोबत मुलाचा जन्म झाल्यानंतर ते रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. बलकौर सिंग यांनी सर्वांसोबत देखील केक कापला. यावेळी ते आनंदी दिसत आहेत.' बलकौर सिंग यांच्या या पोस्टवर सिद्धू मूसवालाच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव सुरू केला. त्याचसोबत कमेंट्स करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धू मूसेवालाच्या एका चाहत्याने लिहिले आहे, 'किंग इज बॅक' दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'आजचा दिवस सिद्धू मूसवालाच्या नावावर आहे.' तिसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'सिद्धू मूसवाला परत आला आहे.' आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'छोटा सिद्धू मूसवाला.' सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला. ५८ व्या वर्षी चरण कौर आई झाल्या आहेत. आयव्हीएफच्या मदतीने सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे.

पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धु मुसेवालावर मानसाच्या जवाहर गावाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिद्धू मुसेवालाचा जागीच मृत्यू झाला होता.

सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या वारसाच्या हितासाठी त्याच्या पालकांनी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धूच्या भावाच्या जन्माची बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सिद्धूच्या वडिलांच्या पोस्टला सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

SCROLL FOR NEXT