Sidhu MooseWala Documentary: दिवंगत पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवालाच्या हत्येवरील माहितीपट प्रदर्शित झाला आहे. बुधवार, ११ जून रोजी सिद्धू मूसेवालाची जयंती देखील आहे. या खास प्रसंगी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने हा माहितीपट दोन भागात यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे. परंतू, गायकाचे वडील बलकौर सिंग यांनी त्याच्या प्रीमियरवर बंदी घालण्याची मागणी केल्याने या माहितीपटावरील वाद आणखी वाढला. त्यांनी मानसा न्यायालयात याचिकाही दाखल केली. परंतु न्यायालयाने माहितीपटावर बंदी घालण्यास नकार दिला.
न्यायालयात याचिका फेटाळल्याने बलकौर सिंग संतप्त आणि निराश असताना, सिद्धू मूसेवालाच्या हत्येवरील माहितीपट बुधवारी सकाळी ५ वाजता प्रदर्शित करण्यात आला आहे. मानसा न्यायालयाने बलकौर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीची तारीख गुरुवारी निश्चित केली आहे. बीबीसी बुधवारी संध्याकाळी मुंबईतील एका सिनेमा हॉलमध्ये हा माहितीपट दाखवणार होते, परंतु वादानंतर, प्रॉडक्शन हाऊसने हा माहितीपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित केला.
सिद्धू मूसेवालाच्या वाढदिवसानिमित्त त्याची तीन नवीन गाणीही रिलीज झाली
दरम्यान, बुधवारी, सिद्धू मूसेवालाच्या वाढदिवसानिमित्त, गायकाची तीन नवीन गाणी यूट्यूब चॅनेलवर देखील रिलीज झाली आहेत. सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनीही मुंबईतील माहितीपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुंबईतील जुहू पोलिस स्टेशनकडे दाखल केलेल्या तक्रारीत बलकौर सिंग सिद्धू म्हणाले की, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ११ जून रोजी दुपारी ३ वाजता जुहूमध्ये माहितीपट दाखवण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करत आहे.
बलकौर सिंग म्हणाले - परवानगीशिवाय माहितीपट बनवला
बलकौर सिंग यांनी असा युक्तिवाद केला की हा माहितीपट त्यांच्या परवानगीशिवाय बनवण्यात आला आहे. त्यात त्यांच्या मुलाच्या हत्येबद्दल चुकीच्या गोष्टी दाखवल्याचाही आरोप करण्यात आला. महाराष्ट्राच्या डीजीपीकडे केलेल्या तक्रारीत, वडिलांनी त्यांच्या मुलावरील बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आणि आरोप केला की हा त्यांचा वारसा कलंकित करण्याचा प्रयत्न असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.