Siddharth Malhotra Viral Dance Video Instagram
मनोरंजन बातम्या

Siddharth Malhotra Viral Dance: बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्राचा अफलातून डान्स, व्हिडीओ व्हायरल

Siddharth Malhotra News: सिद्धार्थ मल्होत्राचा सोशल मीडियावर मित्राच्या लग्नातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Chetan Bodke

Siddharth Malhotra Viral Dance Video

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चित्रपटांमुळे नाही तर, त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे बराच चर्चेत दिसतोय. नुकतंच दिवाळी आणि करवा चौथच्या निमित्त त्यांचे सोशल मीडियावर बरेच फोटो चर्चेत होते.

अलीकडेच दिवाळीनिमित्त सिद्धार्थने पत्नी कियारा अडवाणीसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. त्या रोमँटिक अंदाजातील फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. अशातच सिद्धार्थ मल्होत्राचा सोशल मीडियावर मित्राच्या लग्नातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्याच्या वेगळ्या अंदाजाची चांगलीच चर्चा होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाच्या मिरवणुकीत जबरदस्त नाचताना दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या डान्स व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. त्याच्या डान्स स्टेप्सची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होते. एका यूजरने त्याच्या डान्सच्या व्हिडीओवर कमेंट केली की, “खूप चांगला डान्स करतोय.” तर आणखी एक जण म्हणतो, “सिद्धार्थ मल्होत्रा सारखा मित्र सर्वांनाच मिळायला पाहिजे.” तर आणखी एक जण म्हणतो, “तू खूपच सुंदर दिसतोय.” अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्टवर येत आहेत. (Social Media)

दरम्यान सिद्धार्थच्या लूकबद्दल बोलायचे तर, तो आपल्या मित्राच्या लग्नामध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. ऑफ व्हाईट कलरची शेरवाणी, डिझाईनर शाल, ब्लॅक गॉगल घालून त्याने आपला लूक पूर्ण केला आहे. (Bollywood)

सिद्धार्थने मित्राच्या लग्नातील लूकवरील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने, “बऱ्याच दिवसानंतर काला चष्मा.” अशा आशयचा कॅप्शन देत त्याने फोटो शेअर केले आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Entertainment News)

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे तर, आगामी वर्षात त्याचा ‘योद्धा’ चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये, १५ मार्च २०२४ ला रिलीज होतोय. त्याच्यासोबत चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा एक ॲक्शन मनोरंजन चित्रपट असणार आहे. सिद्धार्थचा ‘मिशन मजनू’ हा अखेरचा चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT